महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर LCB पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात गुटखा अवैध धंद्यावर कारवाई. वाहनासह 11 लाख 72 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त. 3 व्यक्ती विरोधात 2 गुन्हे दाखल, लातूर जिल्ह्यात सर्व अवैध धंद्यावर कारवाया करून जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करून राज्यात लातूर पोलिसांचे आणी SP सोमय मुंढे, IG शहाजी उमाप यांचे नाव गाजवणारे LCB लातूर (प्रमुख) पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी लातूर जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांच्या मनात धडकी भरवली आहे, पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी
(LCB लातूर ) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत. अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 24/10/2024 रोजी (LCB लातूर ) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, काही काही व्यक्ती लपून-छपून नवनवीन मार्गाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी साठवणूक व वाहतूक करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची
शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी दिनांक 24/10/2024 रोजी लातूर शहरातून पोलीस ठाणे रेणापूर व विवेकानंद चौक हद्दी मधून वाहतूक व साठवणूक करण्यात आलेला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 11लाख 72 हजार 650 रूपयाचा गुटखा व सुगंधित तंबाखू , एक इनोव्हा कारसह जप्त करण्यात आले आहे. प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या ट्रान्सपोर्टिंगच्या माध्यमातून वाहतूक व साठवणूक केल्याचे पोलिसांना मिळून आलेले बिलाल महताबसाब तांबोळी, बालाजी
आळणे, फिरोज चांदसाब मणियार यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास रेणापूर पोलीस स्टेशन व विवेकानंद चौक चे पोलीस अधिकारी,अंमलदार करीत आहेत. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात,( LCB ) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, रामहरी भोसले, अर्जुन राजपूत, दीनानाथ देवकते, युवराज गिरी, मनोज खोसे, राहुल कांबळे, खुर्रम काझी, रियाज सौदागर, विनोद चलवाड, जमीर शेख यांनी पार पाडली.