महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनीधी ) – राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी
पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते सोमवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील दयानंद गेट येथे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक महिला, कॉलेज
विद्यार्थिनी महिलांना मोफत बससेवा (सिटीबस) स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल,21 शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख,लातूर शहर सिटी बसचे विकासक पुनीत पाटील, ओमनीफिसेंट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी सिद्धेश्वर मल्लिकार्जुन
जडगोनार माजी नगरसेवक पप्पू देशमुख आयुब मणियार योजना कामेगावकर दत्ता सोमवंशी विजय गायकवाड संजय ओहळ सतीश साळुंके, रोहित दयाळ आधीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. मोफत बससेवा महिला सक्षमीकरणाचे नवा अध्याय लातूर शहरात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक
मोठे पाऊल उचलत आहे. देशात पहिल्यांदाच, लातूर महानगरपालिकेने महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली
आहे. या निर्णयामुळे लातूर शहर महिलांसाठी सुरक्षित आणि स्वतंत्रपणे प्रवास करण्याचे एक आदर्श शहर बनले आहे. लातूर शहरात माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर मध्ये महानगरपालिकेमार्फत
बस सेवा सुरू केली, हा अभिनव उपक्रम असून तिचा
विस्तारही केला, विशेष्ता महीलांसाठी ही बससेवा मोफत सुरू करण्यात आली आहे. हा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी स्मार्ट कार्डचे आज वितरण करण्यात आले.