महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप ) – मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचा भाव 6 हजार रुपयांपर्यंत करावा या मागणीसाठी उद्या सोमवारी (दि .23) सिवनी मालवा येथे ट्रॅक्टर तिरंगा मोर्चा काढण्याची घोषणा राकेश टिकैत यांनी केली आहे. मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन दराच्या प्रश्नावरून 1 ऑक्टोबर रोजी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.
हे आंदोलन भारतीय किसान युनियन आणि संयुक्त किसान मोर्चा (SKM) यांच्या नेतृत्वात केले जाणार आहे. या आंदोलानात सहभागी न होण्याचा निर्णय राकेश टिकैत यांनी घेतला. पण आता त्यांनी सोयाबीन दरावरून आपली भूमिका स्पष्ट करताना, सोमवारी (दि .23) सिवनी मालवा येथे ट्रॅक्टर तिरंगा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचा भाव 6 हजार रुपयांपर्यंत करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. आता या मागणीला जोर धरू लागला असून शेतकरी आक्रमक झाले आहेत. यासाठी 1 ऑक्टोबर रोजी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. याच आंदोलनाकडे भारतीय किसान युनियन (BKU) ने पाठ करत वेगळी
भूमिका घेतली. तसेच चक्का जाम आंदोलन सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी दिली होती. त्यानंतर येथे शेतकरी संघटनांमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली होती.पण आता टिकैत यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना, सध्या राज्यात किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) कमी
किंमतीने सोयाबीन खरेदी केले जात आहे. सध्या सोयाबीन शेतकऱ्यांना त्यांचे पीक 3500 ते 4000 रुपये प्रति क्विंटल दराने विकावे लागत आहे. जे सरकारने ठरवून दिलेल्या 4892 रुपये प्रति क्विंटल एमएसपी पेक्षा कमी आहे. तो खर्चापेक्षा कमी आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीनला अधिक भाव देण्याची मागणी करत आहेत.
याच मागणीसाठी आंदोलने केली जात आहेत. तर आता सरकारला जागे करण्यासाठी सोमवारी सिवनी माळवा येथे ट्रॅक्टर तिरंगा मोर्चा काढणार असल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे. तसेच टिकैत म्हणाले की, काही संघटनांनी या मुद्द्यावर 1 ऑक्टोबरला चक्का जामची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चा या आंदोलानाचा भाग होणार
नाही. ज्या संघटना हे आंदोलन करणात आहेत. त्या संघटना काही राजकीय लोकांशी याच्याशी निगडीत आहेत. जे याला राजकीय बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच याआधीही अशा लोकांनी स्वतंत्रपणे आपली चळवळ चालवावी, असे आवाहन केल्याचे टिकैत म्हणाले.एसकेएम सोयाबीनच्या प्रश्नावर सातत्याने
शेतकऱ्यांचा आवाज उठवत आहे. आताही आम्ही माघार घेणार नाही. आम्ही 1 ऑक्टोबरच्या चक्का जाम आंदोलनात सहभागी होणार नाही. पण शेतकऱ्यांसाठी सोमवारी ट्रॅक्टर तिरंगा मोर्चा काढत आहोत. त्यामुळे सरकारने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी टिकैत यांनी केली आहे.