महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – ओ अमित देशमुख आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलो निलंग्याच्या जनतेला मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्ये नाव घेऊन खोट बोलणारा आणि जनतेला फसवणारा उमेदवार देणार का ? आणि दिलात तर निलंग्याची जनता स्वीकारेल का ? लोकसभे नंतर आता
विधासभेची निवडणुकीची तयारी सुरु आहे, लातूर जिल्ह्यातील निलंगा विधानसभे साठी काँगेस मधून अभय साळुंके इच्छुक आहेत. पण निलंग्याची जनता अभय साळुंके यांनी लोकसभेच्या निवडणुकीत खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारात धड धडीत भर स्टेजवर जरांगे पाटील तुमच्या मागे आहेत असे खोट बोलून
निलंग्याच्या जनतेची आणि विशेषता मराठा समाजाची दिशाभूल करून मत मिळवले, पण वास्तव तर अस काहीच नव्हतं ना जरांगे पाटील यांनी डॉ. शिवाजी काळगे यांच्या मागे असल्याचे कधीही म्हणाले नव्हते मग अभय साळुंके यांनी भर सभेत स्टेजवर खोट बोलून जनतेची फसवणूक केली आणि मत मिळवली ही गोष्ट आता
विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून जर्चेत आहे. जर अभय साळुंके यांना अमित देशमुख अमित देशमुख आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलो यांनी उमेदवारी दिली तर अभय साळुंके यांच्या खोट बोलण्यास हे दोघेही सामील आहेत अस होईल किंवा जरांगे पाटील यांचे नाव घेऊन लोकांना खोट बोललेलं त्यांना मान्य आहे अस
होईल. पण अभय साळुंके यांच्या जरांगे पाटील यांचे नाव घेऊन खोट बोलल्याचा रोष असताना अमित देशमुख आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलो निलंग्यात अभय साळुंके यांना उमेदवारी देणे म्हणजे लोकांचा रोष ओढऊन घेने होईल या शंका नाही. आधीच लोक काँग्रेस विशेषतः अमित देशमुख यांच्यावर नाराज आहे कारण जरांगे पाटील
आणि मराठा आरक्षण आंदोलनामुळे लातूर लोकसभेची सिट सहज निवडून आली पण अमित देशमूख, अभय साळुंके आणि काँग्रेस पक्षाने साधे जरांगे पाटील यांचे आभार किंवा त्यांचे नाव सुद्धा घेत नाहीत याच कारणामुळे निलंग्यात काँग्रेस आणि विशेषता अभय साळूंके यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे पण या नाराजीचा विचार काँग्रेस पक्ष आणि अमित देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलो नक्की विचार करतील.