महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – “एन्काऊंटर असो की आत्महत्या… विकृत प्रवृत्तीचा अंत झाला हीच समाधानाची बाब ” अशी प्रतिक्रिया देत लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत सोमवारी मृत्यू वर आपले मत व्यक्त केले,
विक्रांत गोजमगुंडे हे लातूर सह राज्याच्या राजकारणात आपले स्पष्ट मत व्यक्त होणारे काँग्रेसचे नेते आहेत.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत सोमवारी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्याला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने
ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्यावेळी हा प्रकार घडला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसाच्या हातून बंदूक हिसकावून घेतली आणि एपीआय निलेश मोरे पोलिसांच्या व्हॅन मधून ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारील पोलिसाची बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला. यात आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. या प्रकरणी
लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी एक पोस्ट करत ” #बदलापूर – #बदलापूरा एन्काऊंटर असो की आत्महत्या… विकृत प्रवृत्तीचा अंत झाला हीच समाधानाची बाब ” अशी स्पष्ट आणि मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे.