Home » प्रशासकीय » पावसाळ्यात प्रभाग स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रेरणा होनराव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना

पावसाळ्यात प्रभाग स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रेरणा होनराव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना

महाराष्ट्र खाकी ( लातूर/ विवेक जगताप ) – महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक १५ च्या विकासकामे व नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी नगरसेविका प्रेरणा होनराव यांनी महत्वाची आढावा बैठक घेतली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण मिळावे, यासाठी त्यांनी सखोल चर्चा करत प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या. बैठकीला क्षेत्रीय अधिकारी व सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. स्वच्छता, एसटीपी पॅचवर्क, नालेसफाई, खराब रस्त्यांची दुरुस्ती, मोकाट कुत्र्यांची समस्या, रस्ते दिव्यांची व्यवस्था आदी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

मागील काही दिवसांत नागरिकांनी मांडलेल्या अडचणींची तातडीने दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश प्रेरणा होनराव यांनी अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय, प्रभागातील जुनी व धोकादायक झाडे तातडीने तपासून त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, जेणेकरून पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीत अनेक प्रलंबित अडचणी दूर करण्यात आल्या असून, काही नवीन विकास कामांना तातडीने सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले. नगरसेविका प्रेरणा होनराव यांनी यावेळी म्हणाल्या, “प्रभागातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त पावसाळ्याचा अनुभव मिळावा, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे.

प्रशासनाच्या समन्वयातून प्रत्येक समस्येचे प्रभावी निराकरण करण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे.” प्रेरणा होनराव यांच्या proactive आणि जनसेवाभिमुख कार्यपद्धतीची नागरिकांमध्ये प्रशंसा होत आहे. प्रभागातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Share This News

Related Post

National