महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरात गुन्हेगारीवर कठोर कारवाईचा धडाका कायम ठेवत विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत एका आरोपीला गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
आरोपी आतुल संजय सुपले (वय २८, रा. सद्गुरू नगर, जुना औसा रोड, लातूर) याच्याकडून कोणताही वैध परवाना नसताना गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यामुळे संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी तो हाणून पाडला.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत सहाय्यक फौजदार रविंद्र गोंदकर, पोलीस अंमलदार खुर्रम काझी, गणेश यादव, रणवीर देशमुख, यशपाल कांबळे, योगेश गायकवाड, सचिन राठोड व सोनकांबळे यांनी मोलाची भूमिका बजावली.
“गुन्हेगारांवर पोलिसांचा करडा वचक कायम!”
पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली विवेकानंद चौक पोलिसांची आक्रमक कारवाई सुरूच असून, बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे.



