आमदार धिरज देशमुखांनी प्रचाराचा ताफा थांबवून अपघातग्रस्ताची मदत करून दिले जीवनदान

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप  ) – लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या मुळे दोन अपघातग्रस्तांचे प्राण वाचले. जखमींना त्यांनी आपल्या ताफ्यातील गाडीतून तात्काळ रुग्णालयात पोहचविले. वेळेत उपचार झाल्याने त्यांना जीवनदान मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या धावपळीत

असताना लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी अंबाजोगाई रोडवरील अपघात ग्रस्ताना आपला ताफा थांबवून मदत केली आणी आपल्या ताफ्यातील एका गाडीत अपघातग्रस्ताना रुग्णालयात पोहचवले आणी उपचारात कमी होणार नाही याची काळजी घेतली. भाऊसाहेब धंसिंग चव्हाण असे गंभीर जखमी झालेल्या

व्यक्तीचे नाव असून अन्य एक जन जखमी झाला आहे.
भाऊसाहेब धनसिंग चव्हाण लातूरव्हून वसंत नजर तांड्याकडे ऑटोने निघाले होते. नेहरु नगर तांड्यावर आल्यावर वसंत नगर कडे जाण्यासाठी महामार्गावरुन वळताना आंबेजोगाईकडून भरधाव आलेल्या कारने जोरची धडक दीली. या धडकेत भाऊसाहेब धनसिंग

चव्हाण आणि ऑटो चालक जखमी झाले. आता त्यांच्यावर लातूर येथिल रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी संगितले आहे.

Recent Posts