काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे मरेपर्यंत काँग्रेस सोबत राहणार… – डॉ. अर्चना पाटील चाकूरकर

महाराष्ट्र खाकी ( मुंबई / विवेक जगताप ) – माजी केंद्रीय गृहमंत्री लोकसभा सभापती तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे मरेपर्यंत काँग्रेस सोबत राहणार असल्याचे आम्हाला त्यांनी सांगितलं आहे असे डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी एका मुलाखतीत सांगितल आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री लोकसभा सभापती

तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या (स्नुषा) सुनबाई डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी ( दि. 30 ) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे लातूर जिल्ह्याच्या राजकारणात आणी विशेषतः लातूर काँग्रेस मध्ये खूप मोठा राजकीय भूकंप समजला जात होता कारण लोकांना असे वाटले कि माजी केंद्रीय गृहमंत्री

लोकसभा सभापती तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या भाजपा प्रवेशाला अप्रत्यक्ष पाठिंबा आहे, पण असे काहीच नाही याचा खुलासा खुद्द डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी एका मुलाखतीत सांगितले कि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे मरेपर्यंत काँग्रेस

सोबत राहणार असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले आहे. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या या खुलाशाने गोंधळात पडलेले लातूर जिल्ह्यातील लोक आणी विशेषतः लिंगायत समाजातील लोक काँग्रेस सोबत राहतील, आणी काँग्रेस कडून लोकसभेसाठी उमेदवार असलेले डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या पाठीशी उभे राहतील असे चित्र डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या खुलाशाने निर्माण झाले आहे.

Recent Posts