मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार यांनी सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदारांना मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार यांनी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार यांच्या आढावा बैठकीत श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे,

उपजिल्हाधिकारी संगीता टकले, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांच्यासह सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यावेळी उपस्थित होते. दिव्यांग मतदार, वयोवृद्ध मतदारांसह इतरही मतदारांना मतदान केंद्रांवर

सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदानादिवशी फलक लावून आवश्यक माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार यांनी योग्य नियोजन करावे. दिव्यांग

मतदारांची मतदार केंद्रनिहाय संख्या लक्षात घेवून त्याठिकाणी व्हील चेअर, वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असे श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. भरारी पथकांद्वारे करण्यात येणारी कार्यवाही, क्षेत्रीय अधिकारी आणि इतर पथकांचे प्रशिक्षण, मतदान यंत्र सुरक्षा कक्ष, वाहतूक व्यवस्था, आदी बाबींचा यावेळी आढावा घेण्यात आला.

Recent Posts