महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी पुढाकार घेऊन पोलीस पथके नेमून कारवाया सुरु केल्या आहेत. आणी या कारवायामुळे लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारांना चांगलीच धडकी भरली आहे. LCB पोलीस निरीक्षक संजीवन
मिरकले यांच्या मार्गदर्शनात अशीच एक कारवाई केली आहे. लातूर जिल्ह्यातील विवीध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने LCB पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात LCB पोलिसांचे
पथके माहिती घेत असताना असताना दि. 01/ 04/ 2024 रोजी पथकाला माहिती मिळाली की, चाकूर तालुक्यातील घारोळा येथील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगार आणी त्याने चोरलेल्या मोटरसायकली घरासमोर लावून त्या मोटरसायकली विकण्याचा प्रयत्न करीत आहे ही खात्रीशीर बातमी मिळाल्याने दि. 01/ 04/
2024 रोजी LCB पथक घारोळा तालुका चाकूर येथे पोहचून एका घरासमोर मोटार सायकलसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव उद्धव पांडुरंग सूर्यवंशी, वय 23 वर्ष, राहणार घारोळा असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता
सांगितले कि, सदरची मोटरसायकल 2023 मध्ये चाकूर येथील कोरे हॉस्पिटल समोरून तसेच इतर तीन मोटरसायकली लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केल्याचे सांगितले आरोपीकडून चोरीच्या चार मोटारसायकली ज्याची किंमत 1 लाख 5 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चाकूर पोलीस स्टेशन
येथील एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. उर्वरित तीन मोटार सायकल बाबत तपास सुरू आहे. आरोपीला चाकूर पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाही साठी ताब्यात देण्यात आले आहे आणी पुढील तपास चाकूर पोलीस करीत आहेत. ही कामगिरी LCB पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात सहाय्यक
पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अंमलदार सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, राजेश कंचे, प्रकाश भोसले, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, चालक पोलीस अमलदार चंद्रकांत केंद्रे यांनी पार पाडली.