नेहमीच रुग्णसेवेत व्यस्त असणाऱ्या डॉक्टरांचे कलाविष्कार थक्क करणारे – वैशालीताई विलासराव देशमुख

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – इंडियन मेडिकल असोसिएशन ( IMA ) , लातूर व वुमेन्स डॉक्टर्स विंग चा सांस्कृतिक महोत्सव दिनांक 17 मार्च, 2024 , रविवारी दयानंद सभागृह येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई

विलासराव देशमुख यांची उपस्थिती होती. सदस्य डॉक्टरांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व व्यस्त दिनचर्येमधून वेळ काढून कुटुंबीयांसोबत मनोरंजन व कलाविष्काराचा आस्वाद घेता यावा ह्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) , लातूर तर्फे दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

कार्यक्रमाची सुरुवात कथक नृत्यांगना श्वेता तंत्रे व त्यांच्या चमूने सुंदर अशा गणेश वंदनेने करून सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले. अनेक डॉक्टरांनी ह्या प्रसंगी आपल्या गीतगायन आणि नृत्य या कलाविष्कारांचे सादरीकरण केले. उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या दीप प्रज्वलन व धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करून झाली.

याप्रसंगी IMA लातूरचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली आयएमए लातूरने वर्षभर केलेल्या कामाचा आढावा घेतला. वर्षभरात इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूर शाखेने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जसे की; वेगवेगळ्या महत्त्वाच्या दिवशी रॅली ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या

तंबाखू मुक्ती, व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य, महिला दिवस, आरोग्य दिवस, आत्महत्या प्रतिबंध, अस्थमा ह्या विषयांवर रांगोळी, पोस्टर अशा विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात आली.  मधुमेहावर बोलू काही व हृदयरोग कसा टाळावा? यावर तज्ज्ञांबरोबर जनसंवाद कार्यक्रम देखील घेण्यात आले. ह्या उपक्रमाचा हजारो

रुग्णांनी लाभ घेतला. लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुमारे 225 रुग्णालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरांमध्ये विस हजार पेक्षा जास्त रुग्णांनी तपासणी करून घेतली. मिशन पिंक हेल्थ च्या माध्यमातून 15 शैक्षणिक संस्थांमधील 3500 पेक्षा जास्त शाळकरी

मुली, त्यांच्या माता व शिक्षिका यांच्यामध्ये मासिक पाळी, सोशल मीडिया चा सुरक्षित वापर, शारीरिक व मानसिक आरोग्य याबद्दल समुपदेशन शिबिरे घेण्यात आली.  आयएमए च्या ‘आओ गाव चले’ मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे व समुपदेशन शिबिरे आयोजित करण्यात आली. वाहतूक नियंत्रण पोलीस शाखा यांच्या

सहयोगाने पोलीस कर्मचारी, ऑटो रिक्षा, टॅक्सी व बस चालकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. ह्या शिबिरात व डॉक्टर्स डे च्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करून 150 पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. संघटनेच्या मजबुतीकरणासाठी 76 नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली. डॉक्टरांच्या व

रुग्णालयांच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय जसे की हॉस्पिटल रजिस्ट्रेशन संबंधित समस्या यासाठी शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क व चर्चा, डॉक्टर व रुग्ण यांच्यातील सुसंवाद वाढवा म्हणून पावले उचलणे तसेच विविध परिषदांमार्फत शैक्षणिक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. त्याबद्दल डॉ. अनिल राठी ह्यांनी विस्तृत

माहिती दिली. IMA लातूरचे सचिव डॉ. आशिष चेपुरे यांनी मागील वर्षातील संघटनेच्या महत्त्वाच्या उपलब्धींची माहिती दिली. इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर तर्फे आयोजित जागतिक योग दिवस व जागतिक सायकल दिवस ह्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांना भरघोस प्रतिसाद लाभला. 3 मार्च रोजी

झालेल्या आयएमएथॉन लातूर 2024 ह्या मॅरेथॉन स्पर्धेत 1500 पेक्षा जास्त धावपटूंचा सहभाग नोंदविला गेला. महिला सक्षमीकरण, समानता व सर्वांसाठी आरोग्य ह्या थीमला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वर्षभरात डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी डॉक्टर्स क्रिकेट लीग, इनडोअर स्पोर्ट्स फेस्टिवल ज्यामध्ये कॅरम, चेस, टेबल टेनिस,

बॅडमिंटन, जलतरण इत्यादींच्या स्पर्धा घेऊन बक्षिसे देऊन सहभागींना प्रोत्साहित करण्यात आले. डॉक्टरांच्या कलागुणांना प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी ड्रॉईंग स्पर्धा, रांगोळी कॉम्पिटिशन, फोटोग्राफी व पोस्टर कॉम्पिटिशन सुद्धा घेण्यात आले. अशाप्रकारे इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूर शाखेतर्फे सदस्य डॉक्टरांच्या

सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात आले असे डॉ. आशिष चेपुरे ह्यांनी उपस्थितांना सांगितले.
प्रोजेक्ट चेअरमन व उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागची भूमिका विशद केली. वुमन्स डॉक्टर विंगच्या अध्यक्षा डॉ. प्रीती बादाडे व सचिव डॉ. प्रियंका राठोड यांनी त्यांच्या विंगद्वारे

घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुण्या वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सतत समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूर शाखेचे अभिनंदन केले व डॉक्टरांच्या व्यस्त आयुष्यातून वेळ काढून त्यांचे कलागुण जोपासण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केल्याबद्दल इंडियन

मेडिकल असोसिएशन, लातूरच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. लातूरकर हे कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रांमध्ये नेहमीच अग्रेसर असतात आणि याचा मला अभिमान वाटतो असेदेखील त्यांनी आवर्जून नमूद केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष डॉ. अर्जुन मंदाडे यांनी केले. याप्रसंगी उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. अर्चना

भोसले-किर्दक, IMA लातूरचे नियोजित अध्यक्ष डॉ. उमेश कानडे  यांची देखील उपस्थिती होती. इंडियन मेडिकल असोसिएशन लातूरचा सांस्कृतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ. अनिल राठी, उपाध्यक्ष व प्रोजेक्ट चेअरमन डॉ. अशोक पोद्दार, सचिव डॉ. आशिष चेपुरे, डॉ. अर्जुन मंदाडे, वुमन्स विंगच्या डॉ. प्रीती बादाडे

व डॉ. प्रियंका राठोड व आयएमए लातूरची सांस्कृतिक समिती यांनी परिश्रम घेतले. IMA च्या राज्यस्तरीय कलादर्पण महोत्सवांमध्ये पारितोषिके मिळविलेल्या आयएमए लातूरच्या सदस्यांचा याप्रसंगी प्रमुख पाहुणे वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आयएमए लातूर व मनियार डायग्नोस्टिक

सेंटर, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील ह्या प्रसंगी करण्यात आले. यामध्ये कृष्णा राहुल अभंगे, माही शाम तोष्णीवाल, अद्वय प्रमोद टिके यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके पटकावली. राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये डॉ. अशोक आरदवाड यांना

फोटोग्राफीसाठी , डॉ. रामेश्वरी अलाहाबाद यांना चित्रकलेसाठी, तर डॉ. अनघा राजपूत -निबंध स्पर्धा,  डॉ. स्वप्ना उटीकर व डॉ. नीलरोहित पैके – गीत गायन,  डॉ. निलेश नागरगोजे – कविता व डॉ. मोहिनी गानू व  डॉ. राजश्री सावंत यांना नृत्य या प्रकारांमध्ये पारितोषिके मिळाली. तसेच बॅडमिंटन बॅडमिंटन बॅडमिंटन स्पर्धेमधील

विजेते डॉ. सुधीर जटाळ व डॉ. प्रशांत कापसे आणि उपविजेते डॉ. गणेश असावा, डॉ. अयाज शेख, डॉ. विष्णुदास खंदाडे यांना देखील ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.  तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर शाखेचा संपूर्ण राज्यात कलादर्पण महोत्सवांमध्ये सर्वाधिक पारितोषिके मिळवल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन

गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्या वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते अध्यक्ष डॉ. अनिल राठी व सचिव डॉ. आशिष चेपुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ह्या सांस्कृतिक महोत्सवाची थिम भारतीय संस्कृतीच्या विविधतेची झलक अशी निवडण्यात आली होती. या कार्यक्रमात सर्व डॉक्टर आणी त्यांच्या परिवारातील

सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेतला, या कार्यक्रमाची सांगता हॉटेल ब्रिज यांनी प्रायोजित केलेल्या चविष्ट असे भोजनाने  झाली, त्याचा सर्व इंडियन मेडिकल असोसिएशन सदस्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत मनसोक्त आस्वाद घेतला. डॉक्टरांनी  सादर केलेल्या कलाविष्कारांचे दिग्दर्शन व

संयोजन कोरियोग्राफर समीर बजाज, आकाश मोहिते, सौरभ हुडगे व संगीतकार व गायक डॉ. सुधीर बनशेळकीकर यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूरचा सांस्कृतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ. अनिल राठी, उपाध्यक्ष व प्रोजेक्ट चेअरमन डॉ. अशोक पोद्दार, सचिव डॉ. आशिष चेपुरे, कोषाध्यक्ष डॉ. अर्जुन मंदाडे, वुमन्स विंगच्या डॉ. प्रीती बादाडे व डॉ. प्रियंका राठोड व IMA लातूरची सांस्कृतिक समिती यांनी परिश्रम घेतले.

Recent Posts