महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके) – मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. त्याला राज्यभर मोठा प्रतिसाद मिळत असून लातूर जिल्ह्यातही 9 ते 10 डिसेंबर तारखेला उदगीर, निलंगा, औसा, किल्लारी या ठिकाणी
त्यांची जाहीर सभा होणार आहेत. त्यातील एक सभा निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असल्याने तालुक्यातील प्रत्येक गावागावात बैठकाचे सत्र सुरू झाले आहे. राज्यातील सभेला होणारी गर्दी पाहून निलंगा येथेही लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याने मराठा स्वयंसेवकांनी जय्यत तयारी सुरु
केली आहे.याविषयी आज दि. 3 डिसेंबर रोजी दुपारी सकल मराठा समाजाची तालुका स्तरीय बैठक महाराष्ट्र महाविद्यालय या मैदानावर एक महत्वपुर्ण बैठक आयोजित केली आहे. निलंगा येथील सभेसाठी सहा दिवस शिल्लक राहिले असून त्या दुष्टीकोनातून निटूर सर्कल मधील मुगाव, शेंद, कोतल शिवणी, बुजरुगवाडी,
हन्मंतवाडी, बसपूर ,कलांडी, ढोबळेवाडी, मसलगा, मचराटवाडी, गौर, निटूर, ताजपुर, पानचिंचोली, खडक उमरगा, कवठा पाटी, शिरोळ वांजरवाडा, दगडवाडी, उमरगा, अंबुलगा, मेन अंबुलगा, बोटकुळ, लांबोटा, सावनगीरा, गुऱ्हाळ, उजेड,औराद शहाजनी या मराठा समन्वयकांनी गावात बैठका घेऊन घराघरात माहिती
देऊन जनजागृती केली आहे. निलंगा येथे होणाऱ्या सभेला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार असून कोणतेही गैर सोय होऊ नये यासाठी गावात घेतलेल्या बैठकीत सभेसाठी युकांनी स्वतः समन्वयक म्हणून काम करण्यासाठी नावाची नोंद करून घेण्यात येत आहे.ही सभा अतिशय शांततेत नियोजनबद्ध व्हावी यासाठी मोठ्या
प्रमाणात समन्वयक म्हणून तरुण मुले पुढे येऊन नावे देत आहेत.तसेच समाजातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत ही माहिती जावी यासाठी पोंप्लेट,स्टिकर,बॅनर याचेही वाटप सुरू करण्यात आले आहे.सभेच्या ठिकाणी गावा गावातून जाण्यासाठी वाहनाची सोय,पाण्याची व्यवस्था कशी असेल,वाहन पार्किंग याबद्दलही सर्वांची गैरसोय होऊ नये मार्गदर्शन करण्यात येत आहे.