कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी महसूल दिनासारखे उपक्रम सर्वच शासकीय विभागांमध्ये व्हावेत – पोलीस अधीक्षक सोमय मुंडे

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – वर्षभर शासकीय कर्तव्य पार पाडण्यासाठी राबणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याची संधी महसूल दिनासारख्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळते. आपल्या विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे, सर्वांना एकत्रित आणून त्यांची कार्यक्षमता

वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महसूल दिनासारखे उपक्रम सर्वच शासकीय विभागांमध्ये आयोजित केले जावेत, महसूल विभागामार्फत आयोजित करण्यात आलेला महसूल सप्ताह अतिशय चांगला उपक्रम आहे. यानिमित्त सात दिवस होणारे वेगवेगळे कार्यक्रम कौतुकास्पद आहेत. महसूल विभाग हा प्रशासनातील

महत्त्वाचा विभाग असून सर्व शासकीय विभागांमध्ये प्रमुख समन्वयकाची भूमिका ठेवून शासकिय योजनांचा अंमलबजावणी करण्याचे काम हा विभाग करतो. कायदा व सुव्यवस्थेमध्ये ह्या विभागाची भूमिका महतत्वपूर्ण असल्याचे महसूल दिनी लातूर येथील भक्ती शक्ती मंगल कार्यालयात आयोजित महसूल सप्ताहाच्या उद्घाटन

कार्यक्रमात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे बोलत होते . या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कृष्णा चावरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, डॉ.

सुचिता शिंदे, गणेश महाडिक, नितीन वाघमारे, प्रियांका कांबळे, अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, रोहिणी नऱ्हे-विरोळे, प्रवीण फुलारी, प्रतीक्षा भुते, अविनाश कोरडे, सुशांत शिंदे, सर्व तहसीलदार यावेळी उपस्थित होते.

Recent Posts