युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रमाने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – आण्णाभाऊ साठे हे एक लेखक, लोकशाहीर, साहित्यरत्न तसेच समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी साहित्यक्षेत्राच्या माध्यमातून अनेक लोकनाट्य, प्रवासवर्णन, कथा, कादंबरी, नाटक, शाहीरी, पोवाडे, पटकथा याचे देखील लेखन केलेले आहे. त्यांची फकीरा ही

कांदबरी मराठी साहित्यामध्ये खूप गाजलेली कांदबरी असून या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारदेखील मिळालेला आहे. त्यामुळे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माताजी नगर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपा युवा नेते तथा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून विविध सामाजिक उपक्रमाने आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगरसेवक बालाजी शेळके, गाडेकर महाराज, पाटोळे, साहेबराव आदमाने, लक्ष्मण बिराजदार, नारायण लोखंडे, श्रीराम कांबळे, बाळु घोडके, जयंती

उत्सव समितीचे अध्यक्ष  आश्‍विन कांबळे, करण सकट, परमेश्‍वर उपाडे, राम कांबळे, महेश कांबळे, उत्तम पाटोळे, अक्षय सकट, ईश्‍वर कांबळ, अर्जून सकट, मामा उपाडे, प्रविण उपाडे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त माताजी नगर भागातील

महिलांना दोनशे साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच रक्‍तदान हेच श्रेष्ठदान समजून घेण्यात आलेल्या रक्त्दान शिबीराला पदाधिकारी व कार्यकर्त्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ऐंशी जणांनी रक्‍तदान केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्याहस्ते साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून

व ध्वजारोहन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साहेबा रणदिवे, विशाल शिंदे, अजय उपाडे, आकाश शिंदे, ओम गालफाडे, साहिल सय्यद, अल्ताफ सय्यद, लखन कांबळे, अविनाथ कांबळे, आदींनी परिश्रम घेतले. यावेळी या कार्यक्रमाला माताजी नगर परिसरातील महिला भगिणी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Posts