Gondiya police गोंदिया पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या संकल्पनेतून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना IIB तर्फे NEET साठी मोफत प्रशिक्षण

महाराष्ट्र खाकी (गोंदिया / विवेक जगताप) – आपल्या कार्यातून आणि सतत समाज उपयोगी उपक्रम राबवून देश आणि समाज सेवेचा वसा चालवणारे महाराष्ट्र पोलीस दलातील गोंदिया पोलीस अधीक्षक IPS निखिल पिंगळे यांनी पोलीस आणि जनता यांच्यात एक विश्वासाचे नाते निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करत असतात, निखिल

पिंगळे यांनी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राचा महाब्रँड IIB तर्फे निःशुल्क ऑनलाइन नीट क्लासेसची दि.13 जुलै रोजी या संयुक्त उपक्रमाचे उद्घाटन गोंदिया पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, IIB चे

प्रमुख दशरथ पाटील व इतर पदाधिकारी उपस्तित होते. सामाजिक कार्यात अग्रेसर, आदर्श आयआयबी ! आयआयबी कडून गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालय आणि भामरागड येथे लोकबिरादरी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना नीट साठी मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच परभणी

जिल्ह्यातील स्वप्नभूमी येथील अनाथ विद्यार्थ्यांना देखील मोफत प्रशिक्षणासाठी आयआयबी कडून मोफत ऑनलाईन शिकवणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी सोबत इतर हजारो विद्यार्थ्यांना फीस मध्ये अधिकाधिक सवलत देण्याचे कार्य आयआयबी करते. जेणेकरून

ग्रामीण भागातील होतकरू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या स्वप्नांपासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये याकरिता आयआयबी विद्यार्थ्यांप्रती व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता सहकार्याची भावना जोपासत वाटचाल करत आहे. दादालोरा खिडकी अंतर्गत गोंदिया पोलीस दलाच्या

उपक्रमाला आयआयबी ची साथ, काय आहे दादालोरा उप्रकम – गोंदिया पोलीस दलाकडून आदिवासी, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी या खिडकीची सुरुवात करण्याचा हेतू म्हणजे, या दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून आदिवासी जनतेला विविध शासकीय योजना, शासकीय दाखले, उच्च दर्जाचे कृषी बियाणे, रोजगार व

स्वयंरोजगार या सोबत विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश या खिडकीच्या माध्यमातून राबिवणे हा होता. लवकरच या योजनेला लोकांचा उत्फुर्त प्रतिसाद व सहभाग दिसून आला त्यानंतर सर्व पोलीस / उप पोलीस स्टेशन व पोलीस मदत केंद्र च्या ठिकाणी पोलीस दादालोरा खिडकी तयार करण्यात आली.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे