महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – ज्येष्ठ नागरिक संघ,लातूर यांच्या वतीने हदयविकार या विषयावर डॉ.राजेश पाटील( एम.डी मेडीसीन) यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.दिनांक 24/4/2023 वार सोमवार वेळ सांयकाळी 6.00 वाजता स्थळ-बाबासाहेब पंराजपे वाचनालय,क्रीडा संकुल , लातूर येथे पार पडणार आहे. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभि.आर.बी.जोशी(अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ)लातूर,प्रमुख पाहुणे डॉ. बी. आर. पाटील (अध्यक्ष व मराठवाडा फेसकॉम) हे उपस्थित राहणार आहेत.तरी या व्याख्यानास जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आर.बी.जोशी अध्यक्ष, प्रकाश घादगिने
सचिव,डॉ.काशीनाथराव सलगर सहसचिव ,वंसत बेंडे कोषाध्यक्ष,सदस्य प्रकाश निला,रमेश भोयरेकर,डॉ.भास्कर बोरगांवरकर,सौ.शंकुतला यादव यांनी केले आहे.