लातूरचे मा. खा. डॉ. सुनील गायकवाड लिखीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तक UPSC च्या विद्यार्थ्यांना ठरतेय उपयोगी

महाराष्ट्र खाकी ( दिल्ली / विवेक जगताप ) – लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी त्यांच्या जीवनात अनेक लोक हिताचे कार्य केले आहेत. ते खासदार असतातना लोकसभेतील सर्वात ज्यास्त शिकलेले खासदार म्हणून त्यांची ओळख होती. याच उच्य शिक्षणाच्या मदतीने डॉ. सुनील गायकवाड यांनी अनेक

पुस्तके लिहिली आहेत. डॉ. गायकवाड यांनी लिहिलेल्या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक पुस्तक लिहिले आहे. याच पुस्तकाचा सदर्भ घेऊन यूपीएससी चे प्रसिद्ध इतिहासाचे प्रोफेसर अवध ओझा हे देश विदेशात शिकवण्याच्या पद्धतीने आणि त्यांच्या ज्ञाना मुळे प्रसिद्ध आहेत. प्रो. अवध ओझा यांनी देश – विदेशातील

लेखकांची, राजकारणी व्यापारी यांची पुस्तके वाचली आहेत. प्रो.अवध ओझा हे त्यांनी वाचलेल्या पुस्तकांचा आणि त्या लेखकांचा आयएएस, आयपीएस, आयएफएस, विद्यार्थ्यांना शिकविताना संदर्भ देत असतात. इतिहास विषयात प्रो. अवध ओझा यांचा कोणी हात धरू शकत नाही. त्यांचे हजारो विद्यार्थी आयएएस, आयपीएस,

आयएफएस, देश विदेशात आहेत, ते मोटिवेशन स्पीकर पण आहेत त्यांचे लाखो विव्हर्स यूट्यूब ला आहेत. त्यानी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी दिलेल्या भाषणात लातूर चे माजी लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लिहलेले पुस्तक

वाचण्याचा संदर्भ आणि सल्ला दिला. प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी अनेक पुस्तके लिहली आहेत परंतु बाबासाहेब यांच्यावर लिहलेले पुस्तक अप्रतिम आहे असा उल्लेख करून बाबासाहेबांचे विविध पैलू जाणून घ्यायचे असेल तर बाबासाहेबचे हे पुस्तक आवश्य वाचावे असे आव्हान प्रोफेसर अवध ओझा यांनी केले आहे.

लातूरकरासाठी ही बाब अत्यंत अभिमानाची आहे. लातूर चे नाव पूर्वी रत्नेश्वर होते..अशा लातूर च्या रत्नाचा उल्लेख प्रसिद्ध इतिहास तज्ञ यांनी केल्यामुळे लातूर चे नाव पुन्हा एकदा जगात गेले आहे.

Recent Posts