महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 लढवत असलेल्या कृषी विकास पॅनलचे सर्व उमेदवार आणि विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, सहकारी यांच्यासह माजि मंत्री आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी काल 21 एप्रिल 2023 रोजी लातूर
येथील मार्केट यार्ड मधील गौरीशंकर मंदिरात महाआरती करून ,दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. महाविकास आघाडीच्या कृषी विकास पॅनलचे निवडणूक चिन्ह असलेल्या नंदी बैलाची माजि मंत्री आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी विधिवत पूजा केली. याप्रसंगी मोठ्या
संख्येने जमलेल्या मार्केट यार्ड मधील आडत दुकानदार, व्यापारी, हमाल, मापाडी, तोलारी, गाडीवान आणि शेतकरी यांनी महाविकास आघाडीच्या कृषी विकास पॅनलला भरभरून शुभेच्छा दिल्या. या सर्व कार्यक्रमाने मार्केट यार्डातील वातावरण मंगलमय आणि उत्साह पूर्ण बनले होते. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर
निवडणुक 2023 मधील कृषी विकास पॅनलची भूमिका आणि पॅनल मधील उमेदवारांची पार्श्वभूमीची माजि मंत्री आमदार अमित देशमुख यांनी प्रत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कृषी विकास पॅनलचे सर्व उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे आणि कष्टकरी वर्गातील असून सार्वजनिक कार्यात अग्रेसर असणारे आहेत, त्याचबरोबर या संस्थेच्या
कार्याला योग्य न्याय देणारे आहेत. त्यामुळे ते विक्रमी मताधिक्याने विजयी होऊन बाजार समितीच्या वैभवात भर घालतील असा विश्वास माजि मंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना अमित देशमुख म्हणाले की सभापती ललित भाई शहा , उपसभापती मनोज पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या
कार्यकाळात अत्यंत उत्तम काम झाले आहे. शेतकरी त्याचबरोबर बाजार समितीमधील सर्व घटकांसाठी आवश्यक त्या योजना राबवून त्यांनी जवळपास 100 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा केल्या आहेत यातून या बाजार समितीची पत दहा पटीने वाढलेले आहे. आजवर झालेल्या कामाच्या शिदोरीवर कृषी विकास पॅनल ही
निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास माजि मंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला. या पुढील काळात त्यापेक्षा अधिक चांगले काम होईल अशी ग्वाहीही याप्रसंगी त्यांनी दिली. सर्व मान्यवरांच्या हस्ते कृषी विकास पॅनलच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. विद्यमान बाजार समितीचा पुनर्विकास करीत
असतानाच माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या कार्यकाळात लातूर एमआयडीसी (MIDC) येथे मंजूर असलेल्या 150 एकर जागेवर नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारणीचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल यासह लातूर बाजारपेठेचा लौकिक आणखीन वाढवण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवण्याचे आश्वासन कृषी विकास पॅनलच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.