महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्राचा 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पा बद्दल लातूरचे माजी खासदार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नमो शेतकरी महासन्मान योजना, जलयुक्त शिवार- 2 सुरू करणार, महिलांना एस.टी. बस प्रवासात 50 टक्के
सवलत, मुलीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी शासनाची, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दिड लाखाहून पाच लाखाची मर्यादा, मोदी आवास योजनेतून दहा लाख घरे बांधणार आदीची तरतूद करून शाश्वत शेती, समृध्द शेतकरी, महिलासह गोरगरीब सर्वसामान्यांना दिलासा देणारा आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीन विकासाला
चालना देणारा महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिला भाजपा सेना युतीचा अर्थसंकल्प आहे. राज्यातील भाजपा सेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गुरूवारी विधानसभा सभागृहात पंचामृत ध्येयावर आधारीत सादर केला बळीराजाच्या उत्पन्नासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी
यांनी सुरू केलेल्या पंतप्रधान कृषीसन्मान योजनेत राज्यशासन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे अनुदानाची भर घालणार असून प्रतिवर्षी शेतक-यांना केंद्र शासनाप्रमाणे राज्यशासनाचेही सहा हजार रूपये अनुदान देणार यामुळे शेतक-यांना आता दरवर्षी बारा हजार रूपये मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली. शेतक-यांना
केवळ एक रूपयात पिकीविमा यासह कर्जमाफीचा लाभ उर्वरीत पात्र शेतक-यांना देणार असून मागेल त्याला शेततळे योजनेचा व्यापक विस्तार करण्याचे, शेतीविषयक पायाभूत सुविधा पुरविण्याचे आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे घोषीत केले. एस.टी. महामंडळाच्या बस मधून प्रवास करणा-या सर्वच महिलांना प्रवास तिकीटात
पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नावाने मोदी आवास योजना सुरू करून या योजनेद्वारे दहा लाख घरे बांधणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगीतले. मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना नव्या स्वरूपात मांडून पिवळया आणि केशरी
रेशन कार्ड धारक कुटूंबात मुलगी जन्मल्यानंतर पाच हजार रूपये, मुलगी सहावीत गेल्यास सहा हजार, आकरावीत गेल्यानंतर आठ हजार आणि मुलगी आठरा वर्षाची झाल्यानंतर पंचाहत्तर हजार रूपये देण्यात येणार असल्याचे घोषीत केले. शहराकडे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी गावागावात विकास कार्यक्रम राबविण्याचे
त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत दिड लाखाची मर्यादा वाढवून पाच लाख करण्यात आली आहे. तर राज्यात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने 700 दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.