पोलीस

Latur lcb news LCB ची कामगिरी मारहाण करून मोबाईल पळविणाऱ्या जबरीचोरी मधील आरोपीला मुद्देमालासह अटक

महाराष्ट्र खाकी ( उदगीर / विवेक जगताप ) – मागील चार  महिन्यापूर्वी अनोळखी आरोपींनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एका मोटार सायकल स्वारास अडवून मारहाण करून जबरीने त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेऊन जाण्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक

499/2022, कलम  392, 34 भा द वि ( दुखापत करून लुटणे,लुटण्याचा प्रयत्न करणे) या कलमाखाली  गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलावंडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक तयार करण्यात आले. या पथकाने फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून

त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व लातूर शहरालगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी करण्यात येत होती. दरम्यान दिनांक 07/03/2023 रोजी पोलीस पथकाला मिळालेल्या विश्वासनीय व गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून

आरोपी सुदर्शन अविनाश चव्हाण वय 23 वर्ष राहणार सोमनाथपूर तालुका उदगीर जिल्हा लातूर, यास आष्टा मोड परिसरातून चोरलेला मोबाईल विकण्याचा प्रयत्न करीत असताना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने चार महिन्यापूर्वी उदय गिरी हॉस्पिटलच्या परिसरातील एका पायी जाणाऱ्या इसमास मारहाण

करून,त्याचा मोबाईल आणखीन एक  साथीदार
उदय विजय गिरी वय 20 वर्ष राहणार सोमनाथपूर तालुका उदगीर जिल्हा लातूर. अशा दोघांनी मिळून  जबरीने लुटले, असे  कबूल  करून ताब्यातील आरोपी सुदर्शन चव्हाण याने चोरलेला मोबाईल आणि गुन्हे करताना वापरलेली यामाहा मोटरसायकल असा एकूण

1,15,000/-  रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आणि आरोपी  सुदर्शन चव्हाण यास मुद्देमालासह आष्टा मोड परिसरातून तर आरोपी उदय गिरी यास उदगीर मधून  ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करिता उदगीर ग्रामीण पोलीस येथे हजर करण्यात आले आहे, पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस करत

आहेत. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, राजू मस्के, जमीर शेख, नितीन कठारे यांनी केली आहे.

Most Popular

To Top