राजकारण

निष्ठा, श्रद्धा आणि संयमाची कास धरून चालणारा नेता म्हणजे श्रीशैल ‘दादा’ उटगे

महाराष्ट्र खाकी ( लातूर / वाढदिवस विशेष ) – एखाद्यावर निष्ठा ठेवली तर ती श्रद्धापूर्वक असावी आणि त्या निष्ठेत व श्रद्धेत कधीही स्वार्थ नसावा. मग ती श्रद्धा व निष्ठा देवावर असो, गुरुवर असो की ज्यांना आपण मानतो आशा श्रद्धेय व्याक्तीवर असो. दादांना मी खूप जवळून पाहिलंय. कित्येकदा मीही पोटतिडकीने त्यांना सांगितलं होतं की बस्स झालं आता…कुठवर संयम राखायचा आणि कुठपर्यंत सेवा चाकरी करायची? उभं आयुष्य फक्त मागे पुढे फिरण्यात घालवायचं का? त्यांना असं म्हणण्यात त्यांच्यावरच माझं प्रेम समोर येत होतं. पण दादा

मिश्किलपणे हसत म्हणाले.. आपण चांगलं काम करत राहायचं बाकी वरचा बसलेला बघत असतो तोच निर्णय घेईल काधोतरी… त्यांच्या या बोलण्यात खूप मोठं गांभीर्य लपलेले होते. आपण पाहत असतो की काल परवा पक्षात आलेले कार्यकर्ते सुद्धा त्यांना संधी नाही मिळाल्यावर नेत्यावर तोंडसुख घेऊन घर बदलतात पण दादांना ते मान्य नव्हतं आणि मान्य होणारही नाही. त्यांच्या मते जे घर आपलं आहे त्यात कांही उणिवा असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा ना की आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात आश्रय घ्यावा. संधी ही नेहमी मिळत

असते मग ती लगेच नाही मिळाली तरी नाराज होण्याचे कारण नाही ती मिळते मात्र नक्की यावर दादांचा खूप विश्वास आहे. भादा, बोरगाव किंबहुना मांजरा पट्ट्यातील गावे त्यांनी आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडली आणि कार्यकर्त्यांची मोट बांधली. उत्तम संघटन कौशल्याची जन्मजात देणगी असलेल्या दादांनी तरुणांची एक मजबूत फळी निर्माण करून त्यांच्या नेत्याचे हात मजबूत करण्याचा चंग बांधला. इतर कार्यकर्त्या सारखे ते कधीच वागले नाहीत. आपला नेता मोठा झाला म्हणजे पर्यायाने आपण मोठे झालो हा समजूतदारपणा त्यांच्यात खचाखच

भरलेला असल्याने ते चालत राहिले. पण आपल्या नेत्याबद्दलची श्रद्धा आणि विश्वास कधीही कमी होऊ दिला नाही. बँक, पतसंस्था यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू आणि होतकरू कुटुंबाना आधार दिला. त्यांचे संसार उभे करण्यात दादांचा सिंहाचा वाटा आहे. कांहीही न मागता काम करणाऱ्या या सच्या कार्यकर्त्याला जाणकार नेता विसरणे कधीही शक्य नाही आणि त्यामुळेच दादांना मी गढीवरचा वजीर संबोधले. देशमुखांच्या कुटुंबातील एक अत्यंत विश्वासू आणि जवळचा माणूस म्हणून दादांना ओळखले जाऊ लागले. आपल्या नेत्याला खुश

करण्यासाठी आणि त्यांना काय हवे ते देण्यासाठी दादांनी मागचा पुढचा कसलाही विचार न करता उडी मारली आणि मारुती महाराज साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक एकहाती जिंकत आपल्या नेत्याला एक अमूल्य भेट दिली. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे ते मानसपुत्र म्हणून उगीच ओळखले जात नाहीत. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईत मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता आपला राजा जिंकला पाहिजे यासाठी मेहनत घेतली तशीच दादांनी देशमुख कुटुंबासाठी घेतली आणि त्याचीच फलनिष्पत्ती

म्हणून देशमुख कुटुंबाचे हृदय असलेल्या मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पद त्यांना बहाल करण्यात आले. आज ते दिलीपराव देशमुख साहेबांचं उजवा हात समजले जातात. ,हे उगीच घडले नाही तर त्यासाठी दादांचा त्याग आणि सेवभावी वृत्ती कमी आलीय
सर्वांना सोबत घेऊन चालणारे
औसा तालुक्यांचे भुमिपुत्र असणारे लातूर जिल्हा चे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे हे एक आदर्श असे नेतृत्व असून सर्वांना सोबत घेऊन आपल्या आपण जिल्हाध्यक्ष असून सर्वांना आपल्या सोबत यावे असे अनेकांना वाटते पण

यांचे विरोधी विचार असणारे सर्वांच्या सोबत खेळीमेळीच्या वातावरणात आपुलकीने विचारपूस करणारे व्यक्तीमत्व म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे होय.
कार्यकर्ते यांच्या बारिक सारिक गोष्टी कडे वैयक्तिक लक्ष देणारे नेतृत्व
नेतृत्व हे उगीच तयार होत नाही. काही जण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या सोबत आंदोलनात सहभागी व्हावे,आपण सांगितले ले प्रत्येक काम करावे. या कामाच्या वेळी फक्त अनेकांना कार्यकर्ते आठवतात. काम झाले की फोडणीतील कडीपत्ता जसे बाजुला काढून टाकले जाते.पण या सर्वांच्या विरोधी वृत्तीचे व्यक्तीमत्व म्हणजे च

आजचे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे असून कार्यकर्ते यांच्या बारिक सारिक अडी अडचणी न सांगता तात्काळ सोडवून स्वतः व्यक्तीगत लक्ष घालून सोडविण्यासाठी पुढाकार घेतात. यासाठी त्यांचा हातखंडा कोणीही घेऊ शकत नाही.आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येकांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे.म्हणून तर आजपर्यंतच्या झालेल्या सर्व जिल्हाध्यक्षा पेक्षा सर्वात जास्त आपल्या असंख्य कार्यकर्ते घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करून ती यशस्वी करणारे औशांचे उगवते नेतृत्व म्हणजे च श्रीशैल्य उटगे होय.

सुक्ष्म नियोजन व शिस्त प्रिय
आजच्या या धावपळीच्या जीवनात आंदोलन किंवा कोणतेही कार्यक्रम करणे खुप कठीण झाले आहे. कारण प्रत्येक गोष्टीला बारकाईने व सुक्ष्म नियोजन आवश्यक असते तसेच कार्यक्रम/आंदोलन यशस्वी करण्यासाठी असंख्य अडचणी असतात.त्या बारकाईने व नियोजनबद्ध शिस्तबद्ध यशस्वी करणारै जिल्हाध्यक्ष म्हणजे श्रीशैल्य उटगे होय. प्रतिकुल परिस्थितीतून मार्ग काढण्याची चिकाटी व आपले ध्येय गाठण्याची जिद्द… कोणत्याही कठीण परिस्थितीला न डगमगता सामोरे जाण्याचा त्यांचा

धाडशीपणा अचंबीत करणारा आहे. अतिशय शिस्तप्रिय पण मनाने प्रेमळ मनमिळाऊ हसतमुख व्यक्तीमत्व असे दादा होय. त्यामुळे अनेक जण आपल्या कोणत्याही समस्या मग त्या व्यक्तीगत असो वा कोणत्याही क्षेत्रातील ,समाजातल्या असोत तो दादाकडे प्रश्न गेला म्हणजे उत्तर मिळणारच. समस्येवर समाधानकार तोडगा निघणार..वाट दिसत नसलेल्यांना वाट कार्यातुन दाखवणारे प्रत्येकालाच आपलेसे वाटणारे व्यक्तीमत्व म्हणजे उटगे दादा होय.
कार्यकर्ते व माणसे हाताळण्याची एक लकब

आजच्या घडीला कार्यकर्ते मिळणे खूप कठीण झाले आहे.कारण आज आपल्या सोबत घेऊन असणारा उद्या आपल्या सोबत राहिल हे सांगता येणे कठीण आहे. अशा आजच्या या घडीला सुध्दा शेकडो कार्यकर्ते घेऊन 5दिवस संपूर्ण जिल्हाभरात 93किलोमीटर पदयात्रा काढणे अशक्य गोष्ट आहे.परंतु जे भल्या भल्यांना जमले नाही ते जिल्हाध्यक्ष उटगे यांनी करुन दाखवले. त्यांच्या कडे कोणीही मग तो कोणत्याही पक्षाचा असो.तो जी समस्या घेऊन आला त्यांची तात्काळ दखल घेत ती सोडवण्यासाठी व आलेल्या व्यक्तीला समाधानकारक उत्तर देऊन समस्या

सोडविण्यासाठी पाठपुरावा करणारे एक निस्वार्थी व्यक्तीमत्व असल्याने एकदा त्याच्या सोबत जोडलेला माणूस तुटत नाही म्हणून तर त्यांना कार्यकर्ते व माणसं जोडणारे व्यक्तीमत्व असून यांना कधीही कार्यकर्ते किंवा माणसे यांची कमतरता निर्माण झाली नाही.स्वयंस्फुर्तीने अनेक जण सोबत राहतात.
उत्तम संघटन कौशल्य
कोणतेही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम संघटन कौशल्य आवश्यक असते एका नेतृत्वा साठी जे गुण आवश्यक आहेत ते सारे गुण जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या हाती असल्याने कोणत्याही प्रकारची गोष्ट ते सहज पणे हाताळून यशस्वी करतात अशा या महान कर्तबगार शिस्तप्रिय सर्वांना हावेहवेसे वाटणारे नेतृत्व आदरणीय श्रीशैल दादांचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शब्दांकन सोशल मिडीया औसा तालुका अध्यक्ष विठ्ठल पांचाळ

Most Popular

To Top