महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील विशेषतः लातूर शहरातील विवीध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे नोंद असलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याचा धडाका लातूर LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात चालू आहे. अशातच LCB ने लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन मधील दोन गुन्ह्यांची उकल करून
मुद्देमालासह आरोपीना अटक केली आहे. लातूर शहरात मागील चार महिन्यापूर्वी अनोळखी आरोपींनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका मोटार सायकल स्वारास अडवून मारहाण करून जबरीने त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेऊन जाण्याची घटना घडली होती. त्यावरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 400/2022, कलम 394, 506,34 भा द वि
गंभीर दुखापत करून लुटणे,लुटण्याचा प्रयत्न करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलावंडे यांचे नेतृत्वात पोलीस पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व लातूर शहरालगत
असलेल्या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी करण्यात येत होती. दरम्यान दि.15/01/2023 रोजी LCB पोलीस पथकाला मिळालेल्या विश्वासनीय व गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून आरोपी अंकुश तानाजी जाधव, वय 21 वर्ष राहणार कोल्हे नगर लातूर. यास त्याच्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन विचारपूस केली त्याने चार महिन्यापूर्वी
लातूर शहरात एका मोटारसायकल स्वारास मारहाण करून, त्याचा मोबाईल सुशील रमेश कांबळे राहणार कोल्हे नगर लातूर, विश्वजीत अभिमन्यू देवकते, राहणार कापूर तालुका जिल्हा लातूर या दोन साथीदारासह तिघांनी मिळून जबरीने लुटले आहे, असे कबूल केले पोलिसांच्या ताब्यातील आरोपी अंकुश जाधव याने गुन्ह्यात चोरलेला मोबाईल आणि गुन्हा (जबरी चोरी ) करताना वापरलेली
ज्युपिटर गाडी असा एकूण 41000 रुपयांचा मुद्देमाल LCB पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्यांची पुढील कायदेशीर कार्यवाही करिता शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे पोलीस करत आहेत. गुन्हयातील इतर दोन आरोपी आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेने आणखीन एक कामगिरी करत
लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 17/2023 कलम 379 भादवी मधील शेतातील बोर मोटार स्टार्टर्स चोरलेला आरोपी सोमनाथ शामराव सुळके, वय 27 वर्ष, राहणार भातखेडा तालुका जिल्हा लातूर. याला दि 14/01/2023 रोजी LCB पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात
आलेले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, DYSP लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनातव स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सहाय्यक फौजदार संजय भोसले, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, राम गवारे, माधव बिलापट्टे,
राजेश कंचे, राजू मस्के, जमीर शेख, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, प्रदीप चोपणे, नकुल पाटील यांनी केली आहे.








