महाराष्ट्र खाकी ( हिंगोली / विवेक जगताप ) – हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालये व शाळांचा परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणे तंबाखू मुक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दि. 22 डिसेंबर, 2022 रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या सुचने नुसार जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाद्वारे औंढा (ना)
येथे बसस्टँड परिसरातील पान टपऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या. तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003) नुसार सर्व सार्वजनिक परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ खाणे, थुंकणे, व विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. औंढा (ना) येथे बसस्टँड व मंदिर परिसरात ह्या कायद्याचे उल्लंघन होताना सर्रास दिसते. औंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्हि. के. झुंजारे यांच्या सहकार्याने बीट जमादार
इम्रान पठाण, संदीप टाक, मराठवाडा ग्रामीण संस्था, औरंगाबादचे अभिजित संघई, व जिल्हा रुग्णालया तर्फे आनंद साळवे, कुलदीप केळकर व इतर कर्मचारी ह्यांच्या पथकाने परिसरातील ठिक-ठिकाणी उलघाल करणाऱ्या पान टपऱ्यांवर दांडात्मक कार्यवाही केली. ह्या कार्यवाहीत एकूण 21 लोकांकडून रु. 10650/- एवढा दंड वसूल करण्यात आला. कोटपा 2003 च्या नुसार कलम 4 –
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आहे. कलम 5 – तंबाखूयुक्त पदार्थ जाहिरात बंदी. कलम 6 – ‘अ’ 18 वर्षा खालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ विकण्यास सक्त मनाई. कलम 6 ‘ब’ शैक्षणिक संस्थांच्या 100 मी. परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्री, सेवन बंदी तर कलम 7 – अन्वये कोणत्याही तंबाखूयुक्त पदार्थावर (पाकिटावर) कर्करोगविषयी चेतावणी पाकिटाच्या 85 % भागावर असावी.