महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील विशेषतः औसा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे आवडते नेते आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या कार्यातून राजकारणात विवीध पदे भूषवली आहेत. अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची जिल्ह्यात आणि राज्यात तोड नाही. शेतकऱ्यांसाठी
केलेल्या कार्याची आणि त्यांच्यासाठी असलेल्या आत्मीयतेमुळे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर विधानसभा प्रतिनिधी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. या निवडीबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांचे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रज फडणवीस व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.शेती आणि शेतकरी हा आमदार अभिमन्यू पवार यांच्या जीवाभावाचा विषय, नव्या जबाबदारीच्या माध्यमातून त्यांच्यासाठी भरीव काम करण्याची संधी त्यानां मिळाली असून माझ्यावर व्यक्त
केलेला विश्वास सार्थकी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करिन. असे आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या भावना वेक्त केल्या आहेत. आमदार अभिमन्यू पवार यांच्या या निवडीबद्दल राजकीय आणि विवीध क्षेत्रातून आणि विशेषतः औसा मतदार संघातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.