महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूरच्या बाजार समिती मध्ये खरेदी – विक्री होते राशनचे गहू आणि तांदूळ, बाजार समिती प्रशासक, जिल्हाधिकारी, पोलीस आणि जिल्हा पुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे राशनचा गहू आणि तांदूळ होतो बिनधास्त खरेदी विक्री. शासनाकडून गरीब जनतेला स्वस्तात धान्य मिळावे म्हणून राशन दुकाना
मार्फत गहू आणि तांदूळ वाटप केले जाते. पण हेच गहू आणि तांदूळ लातूरच्या बाजार समिती मधील अडते इंद्रजित हे बिनधास्त खरेदी विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. इंद्रजित हे राशनचा तांदूळ बाजार समिती मध्ये असलेल्या आडत दुकानात गोळा करतात आणि मोठी गडी करून बार्शी रोड लागत असलेल्या
गोल्डक्रिस्ट शाळेच्या मागे वेअर हाऊसचे काम चालू असलेल्या ठिकाणी साठून ठेवत आहेत. हा सर्व गोरख धंदा दिवसाढवळ्या बिनधास्त होत आहे तरी बाजार समितीचे प्रशासक श्री.नाईकवाडी, तहसीलदार स्वप्नील पवार पुरवठा विभागाचे कुलदीप देशमुख शांत आहेत हे विशेष आहे. इंद्रजित यांचा राशनचा धंदा बऱ्याच
काळापासून करत आहेत. तरी प्रशासनाच्या लक्षात आले नही ही दुर्दैवाची बाब आहे आणि गंभीर आहे. गरिबांच्या तोंडच घास काढणाऱ्या या इंद्रजित यांच्या बाजार समिती प्रशासक श्री. नाईकवाडी, तहसीलदार स्वप्नील पवार आणि पुरवठा विभागाचे कुलदीप देशमुख लक्ष देऊन कारवाई करतील अशी अपेक्षा सामान्य गोर गरीब जनता करत आहे.