लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या पुढाकारातून 123 पोलीस अधिकारी व 1934 पोलीस अमलदारांची होतीय आरोग्य तपासणी

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – IPS सोमय मुंडे यांनी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्र घेतल्या पासून सोमय मुंडे यांनी पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा दर महिन्याला प्रशस्तीपत्र, बक्षीस व सन्मान करून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागात

विजेते पोलीसचे फोटो लावून “कौतुकाचा नवा पॅटर्न ” या उपक्रमाचे जिल्ह्यासह राज्यात कौतुक होत असताना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करताना, गुन्ह्यांचा तपास, आंदोलने, मोर्चे, व्हीआयपींचे दौरे, गस्त यामुळे पोलिसांना जास्त वेळ कर्तव्य बजवावे लागते. या कारणाने पोलिसांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार

करून लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक लक्ष्मणराव देशमुख यांच्याशी चर्चा व पत्रव्यवहार करून लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर असलेले 123 पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस अधीक्षक दर्जाचे पोलीस अधिकारी व 1934 पोलीस अमलदारांची आरोग्य तपासणी 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होत असून यामध्ये पोलिसांचे रक्तदाब,

मधुमेह, बीएमआय, ई.सी.जी, लिपिड प्रोफाईल यासारख्या विविध चाचण्या करण्यात येत आहे. पोलिसांच्या आरोग्य विषयक गंभीर समस्याचा वेळीच निराकरण व औषधोपचार होणार असून आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. लातूर जिल्हा लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येतो. अनेकदा पंधरा ते सोळा तास काम करावे लागते. जागरण, अवेळी जेवण यामुळे व्याधी जडतात.

पोलिसांनी निरोगी राहावे या उद्देशाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर पाच दिवस चालणार असून पोलीस स्टेशन स्तरावर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात वैद्यकीय सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी मार्फत पोलिसांची आरोग्य तपासणी होत आहे. हे आरोग्य शिबिर यशश्वी करण्याकरीता अपर पोलीस अधीक्षक

डॉ.अजय देवरे, पोलीस उपाधीक्षक (गृह )अंगद सुडके यांचे मार्गदर्शनात पोलीस कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे हे परिश्रम घेत आहेत. या आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करून घेणारे पोलीस अधिकारी व अमलदारांची संख्यात्मक माहिती तसेच त्यांची तपासणी अहवालाची माहिती संकलित केली जात असून त्या माहितीवरून पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत अशी माहीती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

Recent Posts