महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी चिखुर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी केली. तेव्हा निदर्शनास आले की दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर कर्मचारीही अनुपस्थित होते. दरम्यान, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे.तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्त आरोग्य
सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.राज्यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबध्द राहण्याच्या सूचना त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या ग्रामपातळीपर्यंत सार्वत्रिक, सहजसाध्य व माफक आरोग्य सेवा राज्यातील जनतेला पूरविण्याच्या दृष्टीने आरोग्याच्या सर्व निर्देशांकांवर उत्कृष्ठ कामाची अपेक्षा त्यांनी व्यक्त
केली होती. सार्वजनिक आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असून शासकीय आरोग्य संस्था 24 तास कार्यरत राहतील, आरोग्य सेवांपासुन राज्यातील कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश तुकाराम मुंडे यांनी दिले होते.राज्यातील सर्व आरोग्यकेंद्रांना शिस्त लागावी. तसेच ती पूर्ण कार्यक्षमतेने सुरु व्हावीत अशी अपेक्षा असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले होते. या सूचनेनुसार गुरुवारी
रात्रीपासून लातूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी रात्री आरोग्य उपसंचालक डॉ. कमल चामले यांनी गंगापूर आरोग्य केंद्रास तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी निवळी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली होती. गंगापूरच्या केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते. मात्र, निवळीच्या
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी रात्री लातूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी लातूर तालुक्यातील चिखुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तेव्हा दोन्हीही वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका आणि औषधनिर्माण अधिकारी उपस्थित
नसल्याचे दिसून आले. त्याची गंभीरपणे दखल घेत या पाचही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांच्या अचानक भेटीमुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना धास्ती बसली आहे.