देश

लातूरचे मा.खा.डॉ सुनील गायकवाड यांची प्रथम NES संमत साहित्य संमेलनाच्या चर्चासत्र आणि कवी संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड

महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – नॅशनल एजुकेशन सोसायटी आणि सरस्वती विद्याभवन यांच्या 69 संस्था समुहा तर्फे आयोजित मुंबई येथे होत असलेल्या ‘प्रथम एनईएस संमत साहित्य संमेलनाच्या’ चर्चासत्र आणि कवी संमेलनाच्या अध्यक्ष पदी लातूरचे माजी संसद रत्न खासदार तथा प्रोफेसर.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनासाठी

महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदीया,केंद्रीयमंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे पहिले असे संमेलन आहे की मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ, संस्कृतअशा बहुभाषिक साहित्यिकांचे संमेलम होत आहे. एनईएस आणि एसव्हीवी संस्थेच्या हिरक मोहत्सवी वर्षा निमित्य

15 आणि 16 ऑक्टोबर रोजी मुंबई मुलुंड येथे संपन्न होत आहे. या भरगच्च अशा साहित्य संमेलनात चर्चा सत्रात “मराठी शाळांचे भवितव्य” या सत्राचे अध्यक्ष लातूर चे मा.खासदार तथा सुभारती विद्यापीठ ,मेरठ ( उत्तरप्रदेश) येथे मॅनेजमेंट सायन्स चे ऑनररी प्रोफ़ेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड हे असणार आहेत. याच संमेलनात निमंत्रित कवींचे कवी संमेलन होणार आहे त्या संमेलनाचे

अध्यक्ष पद ही डॉ सुनील गायकवाड भूषविणार आहेत. कार्यक्रमाला देशभरातून साहित्यिक , विद्यार्थी, साहित्य प्रेमी मोठ्या संख्येणी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संमेलनाचे संयोजक महेश भारतीय, हीरकमोहत्सव समिती आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ आर.वरदराजन यांनी प्रसिद्धी पत्रात जाहीर केले आहे. डॉ सुनील गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Most Popular

To Top