लातूर क्रेडाई आयोजित प्रॉपर्टी एक्सपो 2022 चे शानदार उदघाट्न

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहर हे मराठवाड्यातील एक शैक्षणिक व नावाजलेले शहर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी बाहेरगावाहून येणाऱ्यांची संख्या अधिकची आहे. वाढती लोकसंख्या व सर्वसामान्यांना बांधकामाबाबत येणाऱ्या अडचणी यातून आपले घर बांधणे अडचणीचे वाटत आहे. वाढती महागाई तसेच नौकरदारांचा वेळ वाचविण्यासाठी आणि

लातूरकरांना परवडतील व आपल्या पसंतीचे खुले प्लॉट, घर, रो- हाऊस, बंग्लो सर्व सोयींयुक्त खरेदी करण्यासाठी एकाच छताखाली मिळणाऱ्या सोयी आदिंची माहिती व्हावी यासाठी लातूर क्रेडाई संघटनेने लातूर प्रॉपर्टी एक्सपो 2022 खुल्या स्वरूपाचे दालन बांधकाम व्यवसायीकांनी उपलब्ध करून दिले आहे. याचा लातूरकरांनी फायदा घ्यावा व या प्रॉपर्टी एक्सपोतून आपल्या

पसंतीची घर, खुले प्लॉट उपलब्ध होणार आहेत. या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये बिल्डर असोसिएशनसोबतच अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांचाही सहभाग आहे. लातूरकरांना क्रेडाईच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध झाली आहे. या लातूर प्रॉपर्टी एक्ससपोमध्ये लातूर शहरातील नामांकित 45 बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा सहभाग घेतला आहे. ग्रासोबतच ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देणारी स्टेट बँक

ऑफ इंडियाचाही सहभाग आहे तसेच बांधकाम साहित्य पूरवठा करणारे व्यवसायिक व बांधकामासाठी साहित्य पुरविणारे सर्वच उद्योग व्यापारी यांचा सहभाग आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पीएमएवाय ही सवलत ग्राहकांना उपलब्ध होण्यासाठीचेही मार्गदर्शन या मेळाव्यातून ग्राहकांना करण्यात येणार आहे. लातूरकरांना आपल्या आवडीनुसार व परवडतील असे घरे उपलब्ध

करून देण्याचा क्रेडाईचा मानस असून या प्रॉपर्टी एक्सपोच्या माध्यमातून लातूरकरांसाठी आकर्षक व सवलतीच्या दरात योजना उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तरी याचा लातूरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन लातूर क्रेडाईचे अध्यक्ष सुबोध बेळंबे, लातूर क्रेडाईचे चेअरमन जगदीश कुलकर्णी, लातूर क्रेडाईचे माजी अध्यक्ष धर्मवीर भारती, उपाध्यक्ष उदय पाटील,

सचिव महेश नावंदर, सहसचिव नागनाथ गिते, सहसचिव संतोष हत्ते, विष्णु मदने, जयकांत गित्ते, सदस्य दत्ता परशुराम, दिपक कोटलवार, जगदीशर धुत, श्रीकांत हिरेमठ, अमोल मुळे, अजय राजपुत, कमलकिशोर धुत, किरण मंत्री, आदिंनी केले आहे. या कार्यक्रमासाठी क्रेडाईचे नॅशनल उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, आमदार रमेशअप्पा कराड, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., लातूर पोलीस उपअधीक्षक अनुराग जैन मराठवाड्याचे भुमिपूत्र आणि नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष सिनेअभिनेते मकरंद अनासपूरे यांची विशेष उपस्थिती होती.

Recent Posts