महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आणि गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात लातूर स्थानिक गुन्हे शाखेचा (LCB) मोलाचा वाटा असतो आणि आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक गजानन भातलावंडे यांच्या कार्य पद्धतीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. गुन्ह्याची संपूर्ण माहीती घेऊन नियोजन बद्ध प्लॅन करून वेगवेगळी पथक तयार
करून गुन्ह्यांची उकल होई पर्यंत वेवस्तीत लक्ष ठेऊन योग्य मार्गदर्शन करत असतात. LCB ची सूत्र हातात आल्यापासून पोलीस निरीक्षक गजानन भातलावंडे यांनी अनेक गुन्ह्याची उकल केली आहे. गजानन भातलावंडे यांच्या मार्गदर्शनात आणखी एक गुन्ह्याची उकल केली आहे. काही दिवसापूर्वीलातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक
येथे उड्डाणपुलावर अज्ञात दोन आरोपींनी पाठलाग करून एका व्यापाऱ्याला अडवून त्याच्यावर चाकूने वार करून पैशाची बॅग जबरदस्तीने चोरून पळून गेले होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 404/2022 कलम 394 34 भा द वि प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा
लातूर (latur LCB) चे पोलीस निरीक्षक गजानन भातलावंडे यांचे नेतृत्वात विविध पथके तयार करून रवाना करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिनांक 02/10/ 2022 रोजी गोपनीय माहिती मिळाली की, दहा ते बारा दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाण पुलावर व्यापाऱ्याला अडवून लुटमार करणारे
आरोपी खोरी गल्लीत भाड्याच्या रूममध्ये राहत आहेत. अशी गोपनीय माहिती मिळाल्याने माहितीची शहनिशा व विश्लेषण करून सदर पथकाने लागलीच खोरी गल्ली येथील संशयित आरोपी राहत असलेल्या भाड्याच्या रूमवर छापा टाकला. तेथे दोन आरोपी आढळून आले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 1) एक मच्छिंद्र लक्ष्मण कोतलापुरे, वय 29 वर्ष, राहणार
वैशाली नगर, लातूर सध्या राहणार खोरी गल्ली, लातूर. 2)गोपाळ ज्ञानोबा कोतलापुरे, वय 26 वर्ष, राहणार महादेव नगर, लातूर. सध्या राहणार खोरी गल्ली, लातूर. असे असल्याचे सांगून दोघांचा मित्र संजय बत्तीशे या तिघांनी सदरची रूम भाड्याने घेतल्याचे सांगून आम्ही काही दिवसापूर्वी एका व्यापाऱ्याचा पाठलाग करून त्यास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाण पुलावर
रस्त्यावर अडवून चाकूने हल्ला केला व त्याच्याकडील पैशाची बॅग जबरदस्तीने चोरून नेली होती असे सांगितले. तसेच त्यांनी गुन्ह्यात चोरलेले रोख 1 लाख 4 हजार रक्कम , बॅग, मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण 01 लाख 60 हजार रुपयाचा मुद्देमाल काढून दिला तो मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्याच्या पुढील तपासा साठी आरोपींना
शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी प्रवीण राठोड ,पोलीस ठाणे शिवाजीनगर करीत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय कुशलतेने गोपनीय यंत्रणा सतर्क करून विविध सराईत गुन्हेगाराकडे तपास करून खूप काही पुरावे उपलब्ध नसतानाही सदरचा गुन्हा उघडकीस आणून
गुन्हयातील आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे . हि कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलावंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB)सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिल्लापट्टे, राजेश कंचे, नवनाथ हासबे, यशपाल कांबळे, राजू मस्के, बंटी गायकवाड, तूराब पठाण , नकुल पाटील यांनी केली आहे.