महाराष्ट्र

प्रसिद्धी पत्रकाद्वारे टिका करून मंत्रिपद मिळत नसते.. जिल्ह्यातील भाजपमधील आपले स्थान टिकवा नंतर टिका करा आ. निलंगेकारांना काँग्रेसचा सल्ला!

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – रविवारी आ. संभाजी पाटील निलंगेकरांनी एका पत्रकातून शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर आणि काँग्रेसवर टीका केली होती या टिकेला मार्मिक शब्दात लातूर काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनी पोस्ट करत प्रसिद्धी पत्रकाद्वारे टिका करून मंत्रिपद मिळत नसते..

जिल्ह्यातील भाजपमधील आपले स्थान टिकवा नंतर टिका करा असे उत्तर दिले आहे . लातूरच्या राजकारणात भाजपाचे आ संभाजी पाटील निलंगेकर यांनी अनेक आंदोलने केली पण या आंदोलनाची अभ्यासपूर्ण माहीती घेऊन आणि मार्मिक शब्दात उत्तर देऊन हवा काढण्याचे काम लातूर काँग्रेस सोशल मिडीया अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनी केले आहे आणि करत आहेत. महाराष्ट्राच्या

राजकारणातून अस्तित्व पुसले जाण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून बुडत्या काँग्रेसला वाचविण्यासाठी शिल्लक सेनेचा हात पुढे करण्याची ठाकरे यांची तडजोड आता दोन्ही पक्षांना बुडविणार आहे, अशी घणाघाती टीका माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली होती.

Most Popular

To Top