विशाल गिरी निर्मिती “गल्ला” चित्रपटास प्रेक्षकांची पसंती

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूरचे नाव प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यात लातूरच्या भूमी पुत्रांनी प्रयत्न केले आहेत. आणि त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळालेले आपल्याला पहायला मिळते. शिक्षण, क्रीडा, राजकारण, वैद्यकीय आणि अभिनय, कला ई क्षेत्रात लातूरचा ठसा दिसून येतो. चित्रपट सृष्टीत लातूरचे अनेक जणांनी आपले विश्व निर्माण केले आहे. रितेश देशमुख

यांनी अभिनया सोबत चित्रपट निर्मिती क्षेत्रात जसे लातूरचे नाव केले आहे तसेच लातूरच्या आणखी एका भूमी पुत्राने नाव केले ते म्हणजे विशाल गिरी आहेत. विशाल गिरी यांनी लातूरच्या कलाकारांना सोबत घेऊन गल्ला या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. समाजातील वास्तव परिस्तिवर ही फिल्म आहे. या फिल्म मधून समाज जागृतीचे काम केले. या फिल्म मध्ये खुशी पोतदार, प्रीती

दुर्वे, दिनेश भुर्के, बालाजी पोतदार, सनी कुमार, अर्चना सूर्यवंशी,युक्ता पाटील या स्थानिक कलाकारांनी काम केले आहे. लातूरच्या कलाकारांना आणि ॲक्टींग क्षेत्रात ज्यांना करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी विशाल गिरी ॲक्टींग स्कूलची स्थापना केली आहे. भविष्यात या ॲक्टींग स्कूल मधून मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात काम करताना अनेक कलाकार दिसून येतील यात शंका नाही.

Recent Posts