महाराष्ट्र

संकल्प अकॅडमीच्या PV सरांना लातूर पॅटर्नच्या संस्कृतीचा विसर DJ च्या फुल्ल आवाजत रस्त्यावर धरला ठेका

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – कुठल्याही कार्यक्रमात DJ अथवा गाने वाजवण्यासाठी पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी लागते हा साधारण नियम सर्व सामान्य माणसाला माहीती आहे. विशेषतः शिक्षण संस्था आणि हॉस्पिटल असलेल्या भागात तर या नियमांचे पालन पोलिसांकडून काटेकोरपणे केले जाते. पन या सर्व गोष्टी लातूर मधील PV सरांच्या संकल्प अकॅडमी

आणि PV सरांना याची जाणीव आणि गरज वाटली नाही. काही दिवसा पूर्वी NEET UG चा निकाल जाहीर झाला या निकालात PV सरांच्या संकल्प अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून PV सरांचे नाव केले. पन या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ट्युशन ऐरियात मिरवणूक कडून PV सरांनी आणि अकॅडमीच्या वतीने दि.12 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजल्यापासून ते रात्री

पर्यंत जो काय तो तमाशा केला या बद्दल सध्या लातूर शहरात चर्चा आहे. राज्यातच काय पण देशात लातूर पॅटर्न चे नाव आहे. या लातूर पॅटर्नला PV सरांनी आणि त्यांच्या अकॅडमी कडून गालबोट लावण्याचे काम केले आहे असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही! लातूर पॅटर्न मध्ये या पेक्षा चांगले गुण घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेज, क्लासचे नाव केले आहे. पण कधी कुठल्या कॉलेज किंवा क्लासने

असा बेजबाबदार पणाचा तमाशा केला नाही. तो ही पोलीस प्रशासनाची परमिशन न घेता! PV सर पत्रकारांशी बोलताना बोलताना मान्य केले की DJ वाजवण्याची परवानगी ही दि 11 वार रविवारची होती पण ही मिरवणूक दुसऱ्या दिवशी काढण्यात आली म्हणजे दि 12 वार सोमवार रोजी. ही मिरवणूक DJ चा फुल्ल आवाज करून ट्युशन येरियात फिरवकी या मुळे 5 ते 6 तास आजू

बाजूच्या क्लास मधील आणि रिडींग रूम मधील आभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जो त्रास सहन करावा लागला या कडे PV सरांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असे चित्र दिसत होते. या DJ च्या आवाजामुळे बाजूच्या नामांकित क्लास चालकाला एक बॅच दुसऱ्या बिल्डिंग मध्ये घ्यावी लागली. PV सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एक एक मिनिटाचे महत्वाचे सांगतात आणि त्यांच्या कडून असे कृत्य निंदनीय आहे. लातूर पॅटर्न हा सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो लातूर मध्ये लोक असे तमाशे कधी सहन करत नाहीत हे PV सरांना कधी कळणार.

Most Popular

To Top