सचिन सांगळे यांच्या कारवाया मसीहा सारख्या, आणि निकेतन कदम यांच्या कारवाया हिटलर सारख्या कशा ?

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर जिल्हा निर्मिती झाल्यापासून लातूर जिल्हा पोलीस दला मध्ये प्रथमच तिन तरुण IPS पोलीस अधिकारी मिळाले आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी, अवैद्या धंदे, मटका, जुगार, गुटखा विक्री आणि बेकायदेशीर खासगी सावकारीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. लातूर पोलीस मध्ये या अगोदरहि कडक शिस्तबद्ध अधिकारी लाभले होते. शहाजी उमाप, विश्वास

नांगरे पाटील, अरूप पटणायक, सचिन सचिन सांगळे या अधिकाऱ्यांच्या काळात लातूर शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारी कमी झाली होती. बऱ्याच वर्षां नंतर जिल्हा पोलिसात लातूर ग्रामीण पोलीस उप अधीक्षक IPS निकेतन कदम यांच्या रूपाने लातूर जिल्ह्यात विशेषतः लातूर ग्रामीण भागातील गुन्हेगारी, जुगार आड्डे, गुटखा विक्री, मटका हे धंदे चालवणाऱ्यांचे चांगले कंबरडे मोडले

आहे ! लातूर ग्रामीण (चाकूर, रेणापूर) भागात जुगार, मटका, आणि सरकारी परवानगी असलेल्या क्लब मध्ये सरकारी नियम मोडून क्लब चालू असल्यामुळे अनेक परिवार उध्वस्त होत होते. निकितान कदम यांनी अशा प्रकारच्या गोष्टी विरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. एकदा दोनदा नोटीस, तोंडी सांगून हा प्रकार थांबत नव्हता. मग निकेतन कदम यांनी कडक भूमिका घेतली

आणि कारवाया सुरु केल्या. निकेतन कदम यांनी काही दिवसा पूर्वी रेणापूर भागातील एका क्लब वरील कारवाईच्या विरोधात क्लब चालकाने तक्रार केली आणि सोशल मीडिया वरती लातूर पोलिसाबद्दल नकारात्मक वातावरण करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. या कारवाईच्या विरोधात तेच लोक बोलत आहेत ज्यांचे अवैध्य धंदे आहेत. पण रेणापूर भागातील सामान्य जनता

महिला वर्ग, विद्यार्थी, शेतकरी यांनी निकेतन कदम यांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. निकेतन कदम आणि त्यांच्या टिमने इथून पुढे आशा कारवाया चालू ठेवाव्यात अशी भावना व्यक्त करत आहेत. या जुगार, मटका आणि नियम मोडून चालणाऱ्या क्लबमुळे कित्तेक संसार मोडण्याची वेळ आली होती. महिलांवरील अन्याय वाढला होता. मेहनत करून कामावलेला पैसा या जुगार, मटका आणि

क्लब मुळे वाया जात होता. या सर्व गोष्टी आणि आपले कर्तव्य निर्भीड पणे पूर्ण करत निकेतन कदम यांनी कडक कारवाया केल्या आहेत! शहाजी उमाप, विश्वास नांगरे पाटील, अरूप पटणायक, सचिन सचिन सांगळे यांना हि आशा आरोपांचा सामना करावा लागला होता. या सर्व अधिकाऱ्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्या वेळेस त्यांच्या कार्यवाय विरोधात नकारात्मक वातावरण

करण्याचा प्रयत्न केला होता पण आज त्यांच्या कार्याचा दाखला देऊन शहाजी उमाप, विश्वास नांगरे पाटील, अरूप पटणायक, सचिन सचिन सांगळे यांच्या सारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे असे म्हणतात आणि कडक कारवाया केल्या की त्यानां नाव ठेऊन मोकळे होतात. निकेतन कदम यांनी जी कारवाई केली आहे ती एकदम योग्य म्हणावे लागेल ! आणि रेणापूर भागात अशी चर्चा लोक करत आहेत.

Recent Posts