पोलीस

लातूर LCB आणि विवेकानंद चौक पोलीसांच्या संयुक्त कारवाईत 13 चोरीच्या गुन्ह्यांची उकल

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील श्रीनिकेतन सोसायटी येथील दि. 9 जुलै ते 10 ऑगस्ट च्या दरम्यान एका घराचा दरवाजा उघडून घरातून सोन्या-चांदीचे दागदागिने व रोख रक्कम असा 23 लाख 5 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी झाल्याची तक्रार विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे दि. 11 जुलै रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 404/2022 कलम 454, 457,380 भा. द. वि.

प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. लातूर LCB आणि विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. हे पोलीस पथके गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने बातमीदार (खबरी) तयार करून त्यांच्याकडून माहिती मिळवून तसेच इतर भौतिक दूव्यांचा विश्लेषण करून गुन्हा उघडकीस आणण्याकरिता अहोरात्र परिश्रम

घेत होते. दि. 23 जुलै रोजी LCB च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून  गुन्ह्यातील संशयित आरोपी 1) लखन उर्फ अमरदीप दशरथ जोगदंड, वय 29 वर्ष, राहणार साठे नगर,परळी वेस अंबाजोगाई सध्या राहणार काळेवाडी, थेरगाव गावठाण, चांदणी चौक, बापूजी बुवा मंदिराजवळ, पिंपरी चिंचवड, पुणे. 2) किशोर उर्फ पप्पू काशिनाथ जोगदंड, वय 39 वर्ष, राहणार साठे

नगर, परळी वेस अंबाजोगाई, सध्या राहणार, लोणी काळभोर, कोळपे वस्ती, पुणे. 3) प्रवीण उर्फ डॉन्या चंद्रकांत माने, वय 31 वर्ष, राहणार शेपवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड. या आरोपीना त्यांच्या राहत्या जागेवरून पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता या आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारासह लातूर शहरातील श्रीनिकेतन सोसायटी येथील एका घरात चोरी केल्याचे

कबूल केले. आरोपीनी चोरलेल्या मुद्देमाला पैकी 1 लाख 20 हजार रुपये रोख व  गुन्ह्यात वापरलेली एक कार असा एकूण 7 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. आणि गुन्ह्याचा पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (PI) सुधाकर बावकर करत आहेत . या गुन्ह्यातील अटक आरोपीकडे तपास केला असता त्यांनी त्यांचे इतर

साथीदारासह जिल्ह्यात व जिल्हा बाहेर अनेक गुन्हे केल्याचे सांगितले. त्यावरून वरिष्ठाच्या मार्गदर्शनात  विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पथक बाकीच्या आरोपींच्या शोधासाठी मिळालेल्या माहितीचे संकलन व विश्लेषण करून नांदेड, यवतमाळ जिल्ह्यात रवाना करण्यात आले होते. बाकीच्या आरोपींचा व मुद्देमालाचा शोध घेत असताना विवेकानंद चौक पोलीस स्टेशनच्या

पथकाला मिळालेल्या माहितीवरून संशयित आरोपी
1) सूर्यकांत उर्फ सुरेश उर्फ दादा श्रीराम उर्फ राम मुळे, वय 34 वर्ष, राहणार गांधीनगर,अंबाजोगाई,बीड. 2) अविनाश शंकर देवकर, वय 29 वर्ष राहणार वडारवाडा अंबाजोगाई जिल्हा बीड. 3) सुरेश उर्फ सूर्यकांत रामकिशन गंगणे, वय 39 वर्ष ,राहणार उत्तर विहार गल्ली आंबेडकर चौक , अंबाजोगाई जिल्हा बीड. 4) सुदर्शन सुदर्शन उर्फ सोन्या

विठ्ठलराव माने,वय 23 वर्ष, राहणार सुभाष चौक परळी वैजनाथ तालुका परळी जिल्हा बीड. या आरोपीना अतिशय शीताफितीने नांदेड व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमे लगतच्या भागातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी अगोदरच अटक केलेल्या आरोपी सोबत मिळून घरपोडीचे गुन्हे केल्याचे कबूल करून गुन्ह्यात चोरलेल्या मुद्देमाला पैकी सोन्याचे नेकलेस,

अंगठ्या, मंगळसूत्र बांगड्या, सोन्याची बिस्किट, असा एकूण 18 लाख 4 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करून आरोपींना दि. 1ऑगस्ट रोजी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे. चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना विवेकानंद चौक पोलिसांनी नमूद आरोपीकडून 1)  विवेकानंद चौक पोलीस स्टेशन लातूर येथील घरफोडीचे 8 गुन्हे.

2) MIDC पोलीस स्टेशन लातूर येथील 2 गुन्हे
3) शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर येथील 1 गुन्हा
4)  भोकर पोलीस स्टेशन जिल्हा नांदेड येथील 1 गुन्हा
5) अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन जिल्हा बीड येथील 1 गुन्हा असे एकूण घरफोडीचे 13 गुन्हे  उघडकीस आणून आरोपीनी विविध गुन्ह्यात चोरलेला एकूण 900 ग्रॅम  वाजणाचे सोन्याचे दागिने व 500 ग्रॅम चांदीचे वस्तू व रोख

रक्कम  त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 52 लाख 53 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई  लातूर जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. या सर्व आरोपी पैकी  सूर्यकांत उर्फ सुरेश उर्फ दादा श्रीराम उर्फ राम मुळे याच्या विरुद्ध औरंगाबाद व बीड या जिल्ह्यात मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे. व त्याच्या विरोधात विविध जिल्ह्यात

मालाविषयक व शरीराविषयी एकूण 24 गुन्हे दाखल आहेत. आरोपी सुरेश उर्फ सूर्यकांत रामकिशन गंगणे याच्या विरुद्ध बीड जिल्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई झाली असून त्याच्या विरुद्ध विविध जिल्ह्यात मालाविषयक व शरीराविषयी एकूण 5 गुन्हे दाखल आहेत.
आरोपी अविनाश शंकर देवकर याच्या विरुद्ध मालाविषयक व शरीर विषयक असे एकूण 18 गुन्हे

दाखल आहेत. लखन जोगदंड याच्या विरुद्ध 30 गुन्हे तर प्रवीण उर्फ डॉन याचे विरुद्ध 12 गुन्हे दाखल आहेत.
वरील सर्व आरोपी चोरीचे गुन्हे करण्याच्या सवयीचे अट्टल गुन्हेगार असून लातूर पोलिसाने अतिशय कुशलतेने या गुन्ह्याचा तपास करून इतर 13 गुन्हे उघडकीस आणून  52 लाख 53 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लातूर LCB आणि विवेकानंद चौक पोलीसांनी हि

कामगिरी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी DYSP (लातूर शहर) जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद चौक पोलीस स्टेशन , स्थानिक गुन्हे शाखा (LCB) , सायबर सेल यांच्या संयुक्त पथकाने यवतमाळ, नांदेड पोलिसांच्या मदतीने केली असून त्यामध्ये विवेकानंद चौक पोलीस

स्टेशन येथील पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, उदय सावंत, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, बालाजी गोणारकर, हाजी सय्यद, भाऊसाहेब बुड्डे पाटील, पोलिस अमलदार विलास फुलारी,मुन्ना पठाण, संजय कांबळे, रामलिंग शिंदे, दयानंद सारोळे, रमेश नामदास, खंडू कलकत्ते, विनोद चव्हाण, दिनेश हवा, नरेंद्र भुजबळ, अशोक नलवाड, नारायण

शिंदे, किशोरपुरी वेंकुराम मरे ,विशाल मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे व त्यांची टीम, सायबर सेल लातूर येथील पोलीस निरीक्षक अशोक बेले, सहायक पोलीस निरीक्षक सुरज गायकवाड, पोलीस अमलदार संतोष देवडे, गणेश साठे, यांनी केली आहे. तसेच लातूर LCB आणि विवेकानंद चौक पोलीस स्टेशन च्या पथकास नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद

शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पांढरे व त्यांच्या टीमने मोलाची मदत केली आहे.

Most Popular

To Top