महाराष्ट्र

लातूर जिल्ह्यात आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार! – आमदार बाबासाहेब पाटील

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – राज्यात पुढील काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत. आपल्या पक्षाची निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांची समिती गठीत करत आहेत. याच प्रमाणे राष्ट्रवादीने लातूर जिल्ह्यातील आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत व महानगरपालिका या

निवडणुकांसाठी सनियंत्रण करण्याचे काम प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने लातूर जिल्हाअध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील यांची लातूर जिल्हा समन्वय समितीच्या मुख्य समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आणि मतदान करणारे लोक आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार तर एक शिक्षक आमदार आणि एक पदवीधर आमदार आहेत. लातूर

जिल्ह्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्यासाठी प्रयत्नशील असेल,अशी ग्वाही आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. या संधीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष (Sharad Pawar) शरद पवार , विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री ( Ajit Pawar) अजित पवार , प्रदेशाध्यक्ष (Jayant Patil ) जयंत पाटील , खासदार (Supriya Sule) सुप्रिया सुळे यांचे आभार मानले .

Most Popular

To Top