महाराष्ट्र खाकी ( लातूर/ प्रतिनिधी ) – लातूर शहर मनपाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महापालिका आयुक्त व नगररचना विभाग यांनी ( TDR ) टीडीआरची अंमलबजावणी केली त्याबद्दल एसीईए (ACEA) लातूरच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. शहर महापालिका क्षेत्रात हस्तांतरित विकास हक्क ( TDR ) लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे लातूर शहर महानगरपालिका आयुक्त
अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाने ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण करण्यात लातूर महानगरपालिकेने राज्यात प्रथमतः देण्याचा मान मिळवला आहे, शासनपातळीवर मुंबई वगळता इतर सर्व महापालिकेत टीडीआरची नियमावली एकच असावी अशी मागणी आहे, यामध्ये एखाद्या खासगी जागेवर महापालिकेकडून विकास आराखड्यात क्रीडांगण, उद्यान, रस्ते यासह विविध
आरक्षण टाकले जाते. जागेच्या मूळ मालकाला नुकसान भरपाई देऊन ती जागा ताब्यात घेतली जाते; पण अनेकदा महापालिकेची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याचे कारण देऊन या जागा तशाच पडून असतात. अशा परिस्थितीत त्या जागामालकाला पैशाचा मोबादला न देता (TDR) टीडीआरच्या रूपाने प्रमाणपत्र दिले जाते. यामुळे विकास आराखड्यातील आरक्षित जागा ताब्यात घेण्याचा
मार्ग खुला होणार आहे. शिवाय महापालिकेवर आर्थिक बोजा न पडता मूळ मालकांनाही त्यांच्या जागेचा मोबदला मिळेल. तरीही या कायद्यातील पळवाटा शोधून त्याचा गैरवापर होणार नाही, असे म्हणणे योग्य ठरणार आहे.
TDR म्हणजे काय ?
शहराच्या विकास आराखड्यात सार्वजनिक उपक्रमांसाठी जागा आरक्षित केल्या जातात. सर्वच जागा शासनाच्या ताब्यात असतात, असे नाही. काही जागा खासगी मालकीच्या असतात. अशावेळी त्या आरक्षित केलेल्या जागी मूळ मालकांना त्याच्या विकास हक्कापासून वंचित केले जाते व त्या जागेचा मोबदला मूळ मालकांना हस्तांतरित विकास हक्क प्रमाणपत्राच्या रूपाने महापालिकेकडून दिला जातो. त्यालाच टीडीआर म्हणतात. हे विकास हक्क हस्तांतरणीय असल्याने जागामालक स्वत: ते दुसऱ्या ठिकाणी वापरू शकतो अथवा बिल्डरला विकू शकतो.
लातूरकरांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ऑनलाईन टीडीआर ची प्रथमतः अंमलबजावणी करणारे पालिकेचे आयुक्त अमनजी मित्तल, नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक सुनिल देशपांडे,नगर रचनाकार श्रीमती निकिता भांगे यांच्यासह विभागाच्या सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांचे असोसिएशन ऑफ कन्सलटिंग इंजिनिअर्स अँड आर्किटेक्टचे (ACEA ) अध्यक्ष अभिजित देशपांडे सरसंबेकर,उपाध्यक्ष धर्मवीर भारती, इंजि. अमोल सेलूकर, अरिहंत जंगमे, नितीन मंडाळे,मनोज देशमुख, अहमद मुल्ला, सुषमा थोरात, वामन पाटील, आर्कि.विजय सहदेव, शाम संगमकर, विनोद उदगिरकर, वसीम शेख, यांच्यासह लातूरकरांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.