निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा संततधार पावसामुळे गळतीच्या विळख्यात सापडली..!

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील निटूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळा संततधार पावसामुळे गळतीच्या विळख्यात सापडली आहे त्यामुळे अचानक सहा दिवसांपूर्वी शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी शाळेची पाहणी करून आढावा घेतला आहे. जिल्हा परिषद कन्या शाळा म्हणजे शिक्षणाचे माहेर घर माञ या घरात एकूण वर्ग सात आहेत त्यात विद्यार्थींची

पटसंख्या दोनशेच्या घरात आहे संततधार पावसामुळे कन्या शाळा पूर्णत:गळतीच्या कचाट्यात सापडली आहे वर्षापूर्वी या शाळेची देखभाल दुरूस्तीही झाली माञ दुरूस्ती करूनही शाळा गळतीचे प्रमाण मोठ्यासंख्येने वाढल्याने ही पटसंख्या संततधार पावसामुळे काही विद्यार्थींनी कन्या शाळेतृृ न जाता आपल्या घरीच अभ्यासक्रमाचे धडे घेत आहेत.हा प्रकार देखभाल

दुरूस्तीच्या कामामुळे झाल्याची चर्चा सद्यस्थितीला शिक्षण विभागात चर्चिली जात आहे. ज्ञानार्जनाच्या घरात सातही वर्गात संततधार पावसामुळे शाळा गळतीचे प्रमाण वाढत असल्याने शाळेच्या कोरड्या जागेत विद्यार्थींनी ज्ञानार्जन घेत आहेत याकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी शाळेतील विद्यार्थींच्या पालकांनी केली आहे. एकंदर,जिल्हा परिषद

कन्या शाळेतील पटसंख्या दोनशेच्या घरात आहे माञ शाळा गळतीमुळे अभ्यासावर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे त्यामुळे तात्काळ शिक्षण विभागाने हा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. जिल्हा परिषद कन्या शाळेत एकूण वर्ग सात आहेत यात ही शाळा संततधार पावसामुळे पञ्याव्दारे पाणी आणि चौबाजूंच्या भिंतीतून पाणी आत शिरत असल्याने विद्यार्थींनीना आसन व्यवस्थाच नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Recent Posts