महाराष्ट्र

महावितरणकडून निलंगा तालुक्यातील निटूर येथील विजपूरवठा खंडीत होत असल्याने व्यापारी – ग्राहक संतप्त..!

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील निटूर येथील महावितरणकडून विजपूरवठा सततचा खंडीत होत असल्याने व्यापारी – ग्राहक व प्रशासकीय कार्यालयात खरीप हंगामातील पिक विम्यासाठी कागद-पञ काठावे लागतात त्यामुळे नागरिक संतप्त होताना दिसत आहेत. निटूर गावाची लोकसंख्या सोळा हजाराच्या घरात आहे तसेच हे गाव व्यापारीकरणाचे

असल्याने येथील व्यापारी महावितरण विजपूरवठा सततचा खंडीत होत असल्याने धंद्यावर याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे.संततधार पाऊस आला की विजपूरवठा खंडीत होण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे त्यात डासोत्त्पतीत वाढही होताना दिसत आहे त्यामुळे पंखेही थंडावत आहेत.तसेच,घरगुत्ती विजग्राहकांनाही याचा मोठा फटका सहन करावा लागत

आहे दिवसांतून पाच वेळेस विजपूरवठा खंडीत होताना दिसत आहे.त्यामुळे व्यापारी-घरगुत्ती ग्राहक वैतागले आहेत. एकंदर,निटूरमोड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ,उपकेंद्र 33/11 के.व्ही.सबस्टेशनकडून गावातील विजपूरवठा केला जातो माञ गावात दिवसांतून विजगळती होण्याचा प्रकार जास्त वाढत असल्याने महावितरणच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन विजपूरवठा सुरूळीत करण्याची मागणी व्यापारी-घरगुती ग्राहक करित आहेत.

Most Popular

To Top