महाराष्ट्र

आमदार अभिमन्यू पावर यांनी शेत तिथे रस्ता आणि मनरेगातून ग्रामसमृद्धी हे अभियान राज्यभर राबविण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली

महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रेरणा घेऊन औसा विधानसभा मतदारसंघात आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून शेत तिथे रस्ता अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या शेतरस्ते तसेच मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियानातून शेतकरी समृद्धीच्या कामाची माहिती अभिमन्यू पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm Eknath

Shinde) यांची मुंबईत भेटदेऊन या दोन्ही अभियानास व्यापक स्वरूपात राज्यभर राबविण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.आमदार अभिमन्यू पवार यांनी शेत तिथे रस्ता या संकल्पनेतून मतदारसंघात 1 हजार किलोमीटर लांबीचे शेतरस्ते कामे व या शेतरस्ते कामाचे आमदार फंडातून मजबुतीकरण कामे मोठ्या प्रमाणात झाली असून यांचा फायदा शेतकऱ्यांना

समृद्ध होण्यासाठी होताना दिसत आहे. राज्याला आदर्श आशा या औसा पॅटर्नची चर्चा राज्यासह दिल्लीत ही झाली आहे. या अभियानामुळे शेतकऱ्यांना वेळेत शेती पिकांची रास करता येत असून तो माल योग्य वेळीला बाजारात जात असल्याने शेती मालाला योग्य भाव व शेतकऱ्यांच्या खिशातही वेळीत पैसा येत आहे. या शेतरस्ते अभियानामुळे शेतरस्त्यांमुळे होणारे वाद निवळले असून

शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळत आहे. तर शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा या हेतूने ग्रामसमृद्धी या अभियानाच्या माध्यमातून अंदाजे दीड हजार हेक्टरवर फळबाग लागवड झाली असून एक हजार शेतकऱ्यांना जनावरांचे गोठे मिळाले आहेत. शेततळे, गांडूळ व कंपोस्ट खत योजनेतून कृत्रिम खत उपलब्ध होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक

उन्नतीत भर पडली आहे. एकंदरीत या सर्व अभियानाची माहिती आमदार पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या भेटी दरम्यान दिली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रेशीम उद्योगाकडे वळविण्याची आवश्कता असून रेशीम विभागाकडे असलेल्या तुटपुंज्या मनुष्यबळामुळे ते शक्य होत नसल्याचे त्यांना सांगून रेशीम विभाग कृषि विभागात

वर्ग करून तुती लागवडीच्या योजना पोकराच्या धर्तीवर राबविण्यात याव्यात अशीही विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

Most Popular

To Top