महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांची सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी सदर निवेदन माजी पालकमंञी तथा आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी भेटी दरम्यान दिले. सदर निवेदनात माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सोयाबीनचा पेरा 80
टक्केपेक्षा अधिक झाला आहे.जवळपास सर्वच भागामध्ये खरीपाची पेरणी झालेली आहे.माञ जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून लातूर जिल्ह्यात सर्वञ सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे.काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे.या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.त्याचबरोबर गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश ठिकाणी सोयाबीनचे
पिक नष्ट झालेले आहे.तसेच पडणार्या पावसाने लातूर जिल्ह्यातील बहुतांश शेतांमध्ये पाणी साचून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.या ञिसुञी संकटामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे.या परिस्थितीमुळे शेतकर्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावलेले आहे. एकंदर,या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल देण्यासाठी प्रशासनाला सूचना देणे आवश्यक
असल्याचे नमुद केले आहे. त्याचबरोबर या परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकर्यांना तात्काळ मदत देवून दिलासा देणे आवश्यक आहे.सदर निवेदनात मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष देवून शेतकर्यांच्या पिक नुकसानीचे पंचनामे करण्यासह त्यांना मदत करण्याबाबत निर्देश दयावेत,ही मागणी माजी पालकमंञी तथा आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी भेटी दरम्यान मागणी निवेदनाव्दारे केली आहे.