महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – गेल्या काही दिवसांपासून महारष्ट्र राज्यात सत्तानाटय सुरू होते.या दहा दिवसांत अनेक वावडया उठल्या.सरकार राहणार की जाणार यावरच चर्चा सुरू होती. माञ, अखेर 30 जूनला या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाले.महाराष्ट्र राज्यात राजकीय भूकंप झाला असून, महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले असून मुख्यमंञी उध्दव ठाकरे
यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दि. 30 जूनला दिवसभर चर्चा होती की मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस होणार की आणि माजी मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंञी पदाची शपथ घेतली.तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंञी झाले. आता या नव्या सरकारचा पुढील आठवड्यात मंञिमंडळ शपथविधी होणार असून,यात लातूर जिल्ह्याला कॅबिनेट मंञीपद
मिळणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर आता आजी पालकमंञीच्या रूपाने पुन्हा होतील,असे वाटते आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकारण ते सत्तासंघर्षात गेल्या दहा दिवसांपासून एकच चर्चा ती म्हणजे,महाविकास आघाडी सरकार सत्तेत राहणार की पडणार ? शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंञी एकनाथ शिंदे यांनी दहा
दिवसांपूर्वी काही आमदारांना सोबत घेऊन बंड केला.त्यांच्या बंडाने महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली.अनेक दबाव टाकण्यात आले माञ एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली नाही.उलट,एकनाथ शिंदे यांच्याकडे एक-एक आमदार वाढतच गेले.अनेक आमदार आपल्यासोबत आल्याचे लक्षात घेऊन त्यांनी आपला बंड कायम ठेवला.शिवसेनेचे 39 आमदार आणि कांही अपक्ष
आमदार सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचे ठरवले. शेवटी 30 तारखेला सर्व चर्चेला पूर्णविराम मिळाले असून,एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी म्हणूम शपथ घेतली.उपमुख्यमंञी म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणून शपथ घेतली.उपमुख्यमंञी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या
आहेत.कारण,नव्या मंञिमंडळात जाणार नाही असे सांगणारे देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळी आलेल्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर शपथ घेतली.यासर्व घडामोडीनंतर आता सार्यांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे राज्याच्या मंञिमंडळ विस्ताराकडे कोण कोण नव्या मंञिमंडळात असणार याकडे आता नजरा लागल्या आहेत.लातूरला महाविकास आघाडी सरकारमध्ये एक
कॅबिनेट आणि एक राज्यमंञी पद होते.त्यातील कॅबिनेट मंञीपद काॅंग्रेसकडे तर याज्यमंञी हे राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे होते.शिवसेनेचा लातूर जिल्ह्यात एकही आमदार नाही.त्यामुळे नव्या मंञिमंडळात भारतीय जनता पक्षाला मंञीपद मिळणार हे नक्की आहे.कॅबिनेट मंञीपद मिळणार असे खाञीदायक वृृत्त आहे.माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांना कॅबिनेट
मंञीपद मिळेल असे वाटते.त्यामुळे माजी पालकमंञी आता आजी पालकमंञी होणार हे चिञ लवकरच दिसेल.कोणते खाते मिळणार ? याकडे लातूर जिल्हावासीयांच्या नजरा लागून आहेत. माजी पालकमंञी तथा आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी पालकमंञी असताना लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे काम मोठ्याप्रमाणात वन बुथ टेन युथच्या माध्यमातून संघटनेची बांधणी मजबूत केली आहे.तसेच,शेतकर्यांचे कैवारी म्हणून त्यांची ख्याती आहे.म्हणून पक्षश्रेष्ठींने पुन्हा एकदा पालकमंञ्यांची माळ घालावी,असे साकडे कार्यकर्ते घालत आहेत.