पोलीस

खासगी क्लासेस चालक राजाराम धस यांची आत्महत्या !

महाराष्ट्र खाकी (बीड ) – बीड शहरातील नाथसृष्टी भागात राहणारे आणि अंकुश नगर भागात ब्राईट स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक राजाराम धस (वय 40) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, राजाराम धस वीस वर्षांपासून खासगी क्लासेस चालवत होते मूळचे केज तालुक्यातील सारणी गावचे राजाराम धस वडील पोलिसांत असल्यामुळे बीड शहरात वास्तव्याला आले. काही वर्षे शहरातील

जिज्ञासा करिअर अकॅडमी मध्ये शिक्षक म्हणून काम केल्यानंतर गेल्या आठ वर्षापासून शहरातील अंकुश नगर भागात ते स्वतःच ब्राईट स्पर्धा परीक्षा केंद्र चालवत होते. राजाराम धस यांनी आत्महत्या का केली याचं कारण मात्र अद्याप कळलेलं नाही. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं आणि आई वडील असा त्यांचा परिवार आहे. दोन दिवसांपूर्वीच

धस यांनी शहरांमध्ये एका नवीन खासगी क्लासेसच्या शाखेचे उद्घाटन केलं होतं, वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी स्वतः जागा घेऊन हे क्लासेस उभे केले, मात्र एका रात्रीतच असं काय झालं? की त्यांनी अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेनंतर मात्र जिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आणि धस सरांबद्दल आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Most Popular

To Top