महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – केंद्रातील मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाले आहेत. या आठ वर्षात मोदी सरकारच्या कार्याची माहीती सरकार मोठी जाहिरात करून जनतेपर्यंत पोहचवत आहेत आणि देशभरातील भाजपा पधादिकारी, आमदार, खासदार आणि कार्यकर्तेही हे कार्य करत आहेत. त्यात लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे देखील मगे नाहीत. खासदार सुधाकर शृंगारे यांनी
आपल्या फेसबुक, ट्विटर च्या माध्यमातून मोदी सरकारच्या आठ वर्षात केलेले कार्य जनतेपर्यंत पोहचवत आहेत. हे कार्य खासदार एकदम चोख बजावत आहेत. याने त्यांचे वरिष्ठ खुश होतील आणि त्यानां पुढील राजकीय वाटचालीत कुठली अडचण येणार नाही हे मात्र निश्चित म्हणावे लागेल. जसे मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाले हे न विसरता खासदार सुधाकर शृंगारे सरकारचे
कार्य सोशल मीडियावर प्रसिद्ध करत आहेत, तसेच त्यांच्या खासदारकीला तिन वर्ष पूर्ण झाले आहेत हे त्यांनी न विसरता लातूर लोकसभा मतदारसंघसाठी या तिन वर्षात कोणते कार्य केले हे जनतेसमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करावे अशी लातूरच्या जनतेला वाटत नसेल का ? या गोष्टीचा खासदार सुधाकर शृंगारे कधी विचार करतील असा प्रश्न लातूरच्या जनतेला पडला आहे !
असे म्हणण्याची वेळ लातूरकरांवर येऊ नये याची काळजी खासदार घेतीलका? तसे पहिले तर खासदार यांचे लातूरकडे दुर्लक्षच राहिले आहे हे कोरोना काळात लातूरकरांना दिसून आले ! कोरोना काळ संपला आणि खासदार लातूरकरांना दिसले ते फक्त पक्षाच्या किंवा आमदारांच्या कार्यक्रमातच ! सुधाकर शृंगारे यांचे मागील तिन वर्षाचे कार्य पाहता लातूरकरांना माजी खासदार डॉ.
सुनील गायकवाड यांची आठवण आणि त्यांचे कार्य लातूरकरांना बारे वाटेल हे मात्र नक्की आहे. तरी खासदार सुधाकर शृंगारे यांनी लातूरच्या जनतेसमोर तिन वर्षाच्या कार्याची माहीती देतील का ? लातूरकराच्या या प्रश्नाचे उत्तर लातूरकरांना मिळेलका ?