महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील केळगाव येथील सेवानिवृृृत्त कर्मचारी विजयकुमार रामराव पाटील ( केळगावकर ) यांच्या अमृृत महोत्सवानिमित्त ह.भ.प.श्री गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांचे सुश्राव्य किर्तनसेवा केळगाव येथे करण्यात आले आहे. सेवा निवृृृृत्त कर्मचारी विजयकुमार पाटील ( केळगावकर ) यांनी कर्मचारी असताना सर्वसामान्य
नागरिकांच्या कामासाठी अहोराञ प्रयत्न करून न्यायदानाचे काम त्यांनी आपल्या सेवेच्या रूपातुन केले आहे.तसेच,सामाजिक बांधिलकी राखत त्यांनी अनेकांच्या कामी पडले आहेत त्यामुळे आम्हाला आमच्या आदरपूर्वक अमृत महोत्सवाचा कार्यक्रम धार्मिकतेला धरून करण्याचा संकल्प मनाशी बाळगून करत असल्याची प्रतिक्रिया वैभव पाटील ( केळगावकर ) यांनी दिली आहे. केळगाव येथे
ह.भ.प.श्री गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांची सुश्राव्य किर्तनसेवा गुरूवार दि.9 जून 2022 रोजी सायं. 9 ते 12 या दरम्यान स्थळ :- आनंदमुनी विद्यालय केळगाव याठिकाणी भाविक-भक्तांनी उपस्थित राहावे,असे पाटील परिवाराच्या वतीने सांगण्यात आले आहे.