निलंग्यातील महाराष्ट्र काॅलेज आॅफ फार्मसीमधील विद्यार्थ्यांचे एप्रिल- 2022 परीक्षेत घवघवीत यश

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या जी-पॅट परीक्षेत महाराष्ट्र काॅलेज आॅफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.यामध्ये शिंदे अक्षय,वडते नितीन,वसुरे प्रविण,गिरी अंजली,शिंदे भरत,स्वामी प्रतिक्षा,निकम तुकाराम,बरगे सतिश,माने नम्रता या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष

विजयकुमार पाटील निलंगेकर,सौ.वृृशाली विजयकुमार पाटील निलंगेकर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. पदव्यूत्तर पदवी शिक्षणासाठी जी-पॅट ही परीक्षा महत्त्वाची असून ही परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात शिक्षणाची संधी प्राप्त होते.यावर्षी ही परीक्षा दि.9 एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आली होती.त्याचा निकाल दि. 20 मे 2022 रोजी जाहीर झाला आहे.राष्ट्रीय

पातळीवर घेण्यात आलेल्या जी-पॅट परीक्षा बी.फार्मसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना असून ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एम.फार्मसीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवता येतो त्यानंतर प्रवेशाकरिता शासनाकडून दरमहा स्टायफंड सुध्दा प्राप्त होते.तसेच,जी-पॅट परीक्षा उत्तीर्ण होऊन एम.फार्मसी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पी.एच.डी.साठी पेट ही परीक्षा द्यावी लागते.त्यांना

जी-पॅटच्या स्कोअर नुसार पी.एच.डी.ला प्रवेश मिळतो.
जी-पॅट परीक्षेसाठी बी.फार्मसी प्रथम ते अंतिम वर्षाच्या जवळपास सर्व विषयाचा अभ्यास असल्याने ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यानंतर प्रथम वर्षापासून तयारी करावी लागते त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय प्रथम वर्षात असतानाचं ठरविले व त्यात वेळचे नियोजन व अभ्यास केला तर ही परीक्षा काहीच अवघड नसल्याचे मत

प्राचार्य डाॅ.बी.एन.पौळ यांनी सांगितले.सत्कार समारंभ करतेवेळी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य
प्रा.डाॅ.एस.एस.पाटील म्हणाले, की महाविद्यालयात तृृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्या क्षेञात आवड आहे त्याच क्षेञातील त्याच्या कला-गुणा वाव देऊन त्यांची व्यक्तिमहत्वाचा विकास केला जातो.महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जात

असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी आपल्या मनोगतात व्यक्त करताना म्हणाले स्पर्धात्मक परीक्षा खुप कठिण होत चाललेली असून,स्पर्धाही खुप वाढलेल्या आहेत त्यातच दरवर्षी आपल्या महाविद्यालयाकडून स्पर्धा परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर सतत गुणवंत विद्यार्थी देणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमुद केले.

Recent Posts