महाराष्ट्र

विटी दांडू इंटरनॅशनल फेडरेशनचे नवनिर्वाचित आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.डॉ.सुनील गायकवाड यांचे जालन्यात जल्लोषात स्वागत

महाराष्ट्र खाकी ( जालना ) – लातूर माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड आंतरराष्ट्रीय विटी दांडू फेडरेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष यांची विटी दांडू फेडरेशनच्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच जालना शहरात आले असताना, राजे छत्रपती संभाजी राजे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. अंतरराष्ट्रीय विटीदांडू फेडरेशनचे आंतरराष्ट्रीय सचिव प्रशांत नवगिरे,आशिया कोषाध्यक्ष

गौरव नवगिरे, प्रदेशाध्यक्ष डॉ. गजानन वाळके, जालना जिल्हा अध्यक्ष डॉ. बाप्पा मस्के, आदर्श शिक्षक समिती सचिव तसेच अमोल नाकोड आणि विटी-दांडू परिवारातील अनेक मान्यवरांनी छत्रपती संभाजी राजे उद्यानासमोर डॉ. सुनील गायकवाड यांची विटी दांडू इंटर नॅशनल फेडरेशनच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जंगी स्वागत केले याप्रसंगी डॉक्टर

गायकवाड यांनी विटी दांडू ला ऑलिंपिक खेळा मध्ये आणि खेलो इंडिया खेलो या खेळा मध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची लवकरच भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे म्हणाले. डॉ. सुनील गायकवाड यांच्या निवडीबद्दल जालन्यातील विटी-दांडू प्रेमींनी आणि पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

Most Popular

To Top