महाराष्ट्र

‘‘संघर्षशील नेतृत्व ; आमदार रमेशअप्‍पा कराड’’ जन्मदिन विशेष

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – महाराष्ट्रातील गोरगरीब सर्व सामान्य जनतेसाठी, शेतकरी, शेतमजूर, दिन दुबळ्यांसह कष्टकर्‍यांसाठी विविध प्रश्नावर लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी संघर्ष केला. स्व. मुंडे साहेब यांची काम करण्याची पद्धत सर्व सामान्यांसाठी संघर्ष करण्याची धमक आणि ग्रामीण जनतेशी कायम ठेवलेली नाळ, या कामावर प्रभावित होऊन त्यांच्या संघर्षाचा वारसा घेवून

आ. रमेशअप्पा कराड यांनी भारतीय जनता पक्षाचे काम सुरु केले. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाची जबाबदारी लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी रमेशअप्पा कराड यांच्यावर दिली. लातूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्‍हणून ओळखला जातो. या भागात भाजपाचे काम करणे तसे अवघडच होते, मात्र जिद्दीने जोमाने जिवाभाचे कार्यकर्ते निर्माण करुन त्यांच्या सुख

दु:खात सहभागी होऊन प्रस्थापित शक्ति विरुद्ध सतत संघर्ष करत त्‍यांनी भाजपाचे आणि स्व:तचे अस्तित्व लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात निर्माण केले. या मतदार संघात मेहनतीने कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करुन भाजपाचा बालेकिल्ला निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आ. रमेशअप्पा यांची जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी अनेकवेळा अनुभवायला

मिळाली. लातूर ग्रामीण मतदार संघातून प्रस्थापित शक्ति विरुद्ध दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढविली मात्र अवघ्या काही मतांनी पराभव पत्‍करावा लागला. मात्र पराभवाने रमेशअप्पा खचले नाहीत उलट दुसर्‍या  दिवसापासून कामाला लागणारे एकमेव नेते आहेत. आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वात मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या सहा जागेवर, रेणापूर पंचायत समितीच्या

सर्वच्या सर्व आठही जागा जिंकून नवा इतिहास घडविला तर नवनिर्मीत रेणापूर नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकविला यासह स्थानिक ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पुढार्‍यांना नवख्यांनी धूळ चारली अनेक सामान्य कार्यकर्त्याला सन्मानाची पदे मिळवून दिली ही किमया सहज घडली नाही. विविध प्रश्नांवर अनेक आंदोलने

केली, मोर्चे काढले, मेळावा घेवून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्याचा सतत्याने प्रयत्न केला. मागील काळात सोयाबीन अनुदान, अतिवृष्टी नुकसान भरपाई, पिकविमा, दुष्काळी मदत यासह अनेक मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलने केली, संघर्ष केला आणि न्याय हक्क पदरात पाडून घेतला. रेणापूर तहसीलवर पीक विमा आणि वीजबील माफीसह सोयाबीन प्रश्नी हजारो

बैलगाड्यांचा काढलेला मोर्चा ऐतिहासिक ठरला. ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण परत मिळावे यासाठी लातूरात केलेल्या आंदोलनाची महाराष्ट्राने दखल घेतली. मांजरा परिवाराच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकर्‍यांना एफआरपी प्रमाणे गाळप केलेल्या ऊसाला भाव मिळावा यासाठी मांजरा कारखान्याच्या दारात आ. रमेशअप्पा कराड यांनी केलेले आंदोलन लक्षवेधी ठरले. जे काही

करायचे मनातून भव्यदिव्य झाले पाहिजे या भावनेतून करीत असल्याने आ. रमेशअप्‍पा कराड यांचे मोर्चे, मेळावे आणि आंदोलने लक्षवेधी ठरले आहेत आध्यात्मिक,  सामाजिक, शैक्षणिक कार्यासह राजकारणात सतत अग्रेसर राहून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणारे, गोरगरीब सर्व सामान्यांच्या हितासाठी संघर्ष करणारे, गरजुंना वेळोवेळी मदत करणारे भाजपाचे नेते

आ. रमेशअप्पा कराड यश आले म्हणून कधीच उन्मत झाले नाहीत तर अपयश आल्‍याने कधीच खचून गेले नाहीत. गोरगरीब जनतेला, अडचणीत सापडलेल्यांना मदत करणे हे तर रमेशअप्पांच्या आवडीची कामे आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांना आणि अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना, जळीतग्रस्त कुटूंबांना, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना, धान्य, भांडी जिवनावश्यक वस्तुसह जनावरे

खरेदीसाठी मदत अनेकांना केली. आत्महत्याग्रस्त शंभरहून अधिक शेतकरी कुटूंबांना प्रत्येकी १० हजाराची मदत केली. दिव्यांगांना सायकली, कुबड्या, श्रवणयंत्राचे वाटप केले. याचबरोबर अनेकांना शिक्षण, आरोग्‍य,  क्रिडा, उद्योग व्यवसायासाठी मदत करून आधार दिला. मदत करताना कोण कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे. याचा किंचीतही विचार न करता स्वत:च्या खिश्यातून

अनेकांना मदत करणारे आ. रमेशअप्पा कराड हे खरोखरच आधारवड आहेत. गेल्या पंधरा वीस वर्षात रमेशअप्पा कराड यांनी भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी प्रयत्न केले. पक्षाच्या वतीने दिलेले कार्यक्रम प्रत्येक वेळी यशस्वी केले. विविध निवडणुकीत पक्षाला मिळवून दिलेले यश या सर्व कामाची दखल घेवून भाजपाचे नेते माजी मुख्‍यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,

प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी रमेशअप्‍पा कराड यांना बिनविरोध विधानपरिषदेचे सदस्‍य केले. रमेशअप्‍पा आमदार व्‍हावेत ही गोरगरीब, सर्व सामान्‍यांची इच्‍छा यानिमित्‍ताने पूर्ण झाली. आप्पा आमदार झाले याचा आनंद गोरगरीब, सर्वसामान्‍य कार्यकर्त्‍यांना कितीतरी पटीने झाला. प्रत्‍येकाला आपल्‍या हक्‍काचा माणूस आमदार झाला याचा प्रत्‍यय लहान मोठया कामाच्‍या

निमित्‍ताने आप्‍पांना भेटण्‍यास येणार्‍या प्रत्‍येकाला अनुभवायास मिळाला. आमदार झाले म्‍हणून आप्पांमध्ये कुठलाच बदल झाला नाही. सर्वांना सहजतेने उपलब्‍ध होणारे आप्‍पा, आमदार झाल्‍यानंतरही त्‍याच पध्‍दतीने भेटू लागले. येणार्‍या प्रत्‍येकाच्‍या अडीअडचणी समजून घेवून त्‍या  सोडविण्‍याचा प्रयत्‍न करू लागले. खरोखर हक्‍काचा आमदार रमेशअप्‍पाच्‍या रूपाने सर्वसामान्‍यांना  मिळाला

आहे. कोरोनाच्‍या काळातच आप्‍पा आमदार झाले. देशातच नव्‍हे तर संपूर्ण जगात कोरोनाच्‍या संकटाने हाहाकार माजविला. कोरोनामुळे संकटात सापडलेल्‍यांना आ. रमेशअप्‍पा कराड यांनी दोन-तीन महिने दोन वेळचे जेवणाचे डब्‍बे  त्‍यांच्‍यापर्यंत पोहचते केले. गरजू रूग्‍णांना तात्‍काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आपल्‍या आमदार निधीतून रेणापूर,  मुरूड येथील ग्रामीण

रुग्णालयासह पोहरेगाव, जवळ (बु), तांदुळजा,  बोरी,  कारेपूर आणि बिटरगाव येथील आरोग्‍य केंद्रास सुसज्‍ज रूग्‍णवाहिका दिल्‍या. लातूर येथे निर्माण होत असलेल्‍या जम्‍बो  कोविड रूग्‍णालयासाठी आणि अत्‍यावश्‍यक यंत्रसामुग्री व साहित्‍य खरेदीसाठी एक कोटी रूपयाचा निधी दिला. एमआयटीच्‍या यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयात उपचार घेणार्‍या रूग्‍णांना आणि त्‍यांच्‍या

नातेवाईकांना दोनवेळचे मोफत जेवण आणि निवासाची सोय केली. मतदार संघातील आशा सेविकांसह विविध कोरोना योध्‍दांना वेळोवेळी सन्‍मान करून प्रोत्‍साहन दिले.
विधीमंडळाचे कोरोनामुळे पूर्ण कार्यकाळ कोणतेच अधिवेशन झाले नाही. जेवढे दिवस अधिवेशन झाले त्‍या  त्‍या वेळी शेतकरी, व्‍यापारी, उद्योजक यासह विविध प्रश्‍नावर आवाज उठविला. केंद्रशासन आणि राज्‍यशासन

यांच्‍याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून लातूर ग्रामीण मतदार संघातील रस्‍त्‍याच्‍या कामासाठी व विविध गावच्‍या  विकासासाठी कोटयावधी रूपयाचा निधी मंजूर करून आणला. कोरोनामुळे व्‍यापक कामगीरी करता आली नसली तरीही लातूर ग्रामीण मतदार संघात अनेक कामांना मंजूरी मिळवून दिली त्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत हे खुप

दिलासादायक आहे. येत्‍या काळात निश्चितपणे आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या हातून विधायक कामे होतील यात शंकाच नाही. राजकारण आणि त्‍यातून मिळालेली पदे स्‍व:तासाठी नव्‍हे तर समाजाला उभा करण्‍यासाठी,  अडचणीत,  संकटात सापडलेल्‍यांना मदत करण्‍यासाठी आहेत. याची जाण आणि भान ठेवून राजकारण समाज संपन्‍नतेसाठीच आहे हे तत्‍व अंगीकारून भाजपाचे नेते

आ. रमेशअप्‍पा कराड यांनी समाजसेवेचे ओझे अखंडपणे वाहून नेत आहेत. येत्‍या काळात आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात उतुंग भरारी घेवून अनेकांच्‍या डोळ्यातील अश्रू पुसण्‍याचे काम करतील यात शंका नाही. हीच जन्मदिनानिमित्ताने सदिच्छा !!!

काबाड कष्ट करणार्‍या शेतकर्‍यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे, त्यांच्या घामाचे मोल झाले पाहिजे. शेतकरी, कष्टकरी, शेतकजूर यांच्यासह सर्वसामान्यांना न्याय मिळायला हवा यासाठी राजकिय क्षेत्रात आल्यापासून सतत संघर्ष करणारे भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड आणि संघर्ष एकाच नान्याच्या दोन बाजू म्हटलं तर वावगं ठरणारे

नाही. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेवून भाजपा पक्षश्रेष्ठीने जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषदेचे सदस्य या दोन्ही महत्वाच्या जबाबदार्‍या त्यांच्यावर सोपविल्या. रमेशअप्पा यांनीही कामाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचं सोनं करुन दाखविण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. येत्या काळात आ. रमेशअप्पा कराड यांच्या हातून सर्वांगीन विकास कामासह

गरजुंच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी. त्यांच्या आध्यातिमक, सामाजिक आणि राजकिय कामाचा पताका अखंडपणे फडकत राहो हीच जन्मदिनानिमित्ताने सदिच्छा !!! ……चंद्रकांत कातळे, रेणापूर

Most Popular

To Top