महाराष्ट्र

पालकमंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानांतर्गत उद्या रविवार परळीतील बरकत नगर (प्रभाग क्र. 2) भागात देणार भेटी

महाराष्ट्र खाकी ( परळी ) – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी शहरात मागील रविवार पासून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रवादी आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून धनंजय मुंडे हे परळी शहरातील नागरिकांच्या भेटीसाठी या रविवारी (दि. 29) सुद्धा येणार असून, ते सकाळी 8 वाजल्यापासून शहरातील बरकत नगर (प्रभाग क्र. 2) भागात नागरिकांच्या भेटीसाठी येणार आहेत.

धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी आपल्या दारी या अभियानास परळी शहरात प्रचंड प्रतिसाद मिळत असून, प्रत्यक्ष मंत्री महोदय आपल्या घरी येऊन आपल्याशी संवाद साधत आपल्या अडचणी जाणून घेत आहेत, तसेच पक्षातील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी घेत आहेत, त्यामुळे एक वेगळेच चैतन्य व उत्साह पाहायला मिळत आहे.

दरम्यान रविवारी (दि. 29) प्रभाग क्रमांक 2 मधील बरकत नगर भागात धनंजय मुंडे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत घरोघर भेटी देणार असून, नागरिकांशी संवाद साधत ते राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय सदस्य नोंदणी अभियान देखील राबवणार आहेत. यावेळी सर्व नगरसेवक, पदाधिकारी, सर्व फ्रंटलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस परळी शहर आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Most Popular

To Top